Join us  

मान गए खिलाडी...! अक्षय कुमारच्या माणूसकीचं घडलं दर्शन, वाचून तुम्हाला वाटेल त्याचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:08 PM

सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते करताहेत त्याची प्रशंसा

सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ग्लास टँकवर परफॉर्म करताना एक व्यक्ती बेशुद्ध झाला होता आणि त्याला वाचवण्यासाठी अक्षय कुमार गेल्याचं दिसतं आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयने आगामी चित्रपट हाऊसफुल ४च्या प्रमोशनला सुरूवात केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो रिएलिटी शोमध्ये गेला होता. तिथे त्याने तो खिलाडी असल्याचं सिद्ध केलं. या शोच्या सेटवर एक व्यक्ती स्टंट करत होता आणि स्टंट करताना तो बेशुद्ध पडला. त्याला बेशुद्ध पडलेलं पाहून अक्षय त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. क्रु मेंबर पोहचण्याआधीच अक्षयनं त्याला मदत केली. अक्षयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अक्षय कुमार लवकरच हाऊसफुल ४ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत रितेश देशमुख, कृति सेनॉन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, राणा दग्गुबाती, चंकी पांडे, बोमण ईराणी, जॉनी लीवर व राजपाल यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

. ‘हाऊसफुल’ फ्रेन्चाइजीच्या या चौथ्या चित्रपटात कॉमेडी आणि पीरियड ड्रामा याचे भन्नाट मिश्रण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. यात 1419 आणि 2019 असे दोन काळ आपल्याला पाहायला मिळत आहे.

 ट्रेलरची सुरुवात 1419 काळातील व्यक्तिरेखांपासून होते. आपल्याला अक्षय, रितेश, बॉबी सगळेच एखाद्या राजा-महाराजांच्या वेशात पाहायला मिळतात. त्यानंतर आधुनिक काळ पाहायला मिळतो. यात रितेश आणि अक्षय लंडनमध्ये दिसतात.

चित्रपटाचा सेट अतिशय भव्य असून अक्षयचा एक वेगळाच अंदाज या ट्रेलरमध्ये दिसतो.

टॅग्स :अक्षय कुमारहाउसफुल 4