Join us  

Bachchhan Paandey Trailer: बच्चन पांडे ला रहे हैं होली पे गोली...; पाहा, ‘बच्चन पांडे’चा धमाकेदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:51 AM

Bachchhan Paandey Trailer: ‘धूम धडाका रंग पटाखा, आओ बन लो टोली, इस बार बच्चन पांडे ला रहे हैं होली पे गोली...,’असं कॅप्शन देत अक्षयने ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर शेअर केला आहे.

 Bachchhan Paandey Trailer: अक्षय कुमार (Akshay Kumar) व क्रिती सॅनन ( Kriti Sanon) यांचा ‘बच्चन पांडे’ ( Bachchan Paandey ) हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येतोय. तूर्तास या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ‘धूम धडाका रंग पटाखा, आओ बन लो टोली, इस बार बच्चन पांडे ला रहे हैं होली पे गोली...,’असं कॅप्शन देत अक्षयने ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर शेअर केला आहे. 3.42 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारसोबत क्रिती सॅनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, जॅकलिन फर्नांडिस व संजय मिश्रा दिसतात.

ट्रेलरची सुरूवात एकदम हटके आहे. सुरूवातीला क्रिती सॅनन दिसते. मला कुणावर चित्रपट बनवायचा आहे, अखेर मी ठरवलंय, असं क्रिती म्हणते आणि काही सेकंदात बच्चन पांडेची धाकड एन्ट्री होते. रावण है वो रावण, उसका दिल और आंख दोनो पत्थर की है, असं अर्शद म्हणतो. पुढे अक्षयचे फायटिंग सीन्स दिसतात. अक्षयने या सिनेमात कुख्यात गँगस्टरची भूमिका साकारली आहे. 

‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचं नाव अक्षयच्या एका भूमिकेवरून ठेवण्यात आलं आहे. 2008 मध्ये प्रदर्शित ‘टशन’ या चित्रपटात अक्षयने बच्चन पांडे नावाची भूमिका साकारली होती. त्यापासून प्रेरित होऊन या चित्रपटाचं नाव ‘बच्चन पांडे’ असं ठेवण्यात आलं आहे. तसा हा चित्रपट साऊथच्या ‘वीरम’ या चित्रपटाचा रिमेक म्हणून बनवला जाणार होता. पण नंतर मेकर्सनी संपूर्ण स्क्रिप्ट बदलवून एक ओरिजनल कहाणी बनवण्याचा निर्णय घेतला. ‘बच्चन पांडे’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या 18 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

‘बच्चन पांडे’चं दिग्दर्शन फरहाद सामजी याने केलं आहे. अक्षय व फरहाद यांनी याआधी हाऊसफुल 3 व हाऊसफुल 4 साठी एकत्र काम केलं होतं.

टॅग्स :अक्षय कुमारक्रिती सनॉन