Join us  

आता अशी दिसते अक्षय कुमारची पहिली हिरोईन, लहान वयातच लग्न करत बॉलिवूडपासून गेली दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 2:18 PM

'सौंगध' सिनेमानंतरही शांतीप्रियाचे स्ट्रगल सुरुच राहिले. अगदी कमी वयात लग्न करुन ती संसारातच रमली. १९९९ साली शांतीप्रिया सिद्धार्थ रेसोबत लग्नबंधनात अडकली होती.

अक्षय कुमारने बॉलीवुड मध्ये 30 वर्ष पूर्ण केली आहेत. अक्षयचा सौगंध हा पहिला सिनेमा  25 जनवरी 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. सौंगध सिनेमातून अक्षयने बॉलिवूड पदार्पण केले होते. अक्षयचा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉपही ठरला. मात्र हार न मानता त्याने आपले काम सुरुच ठेवले आणि आज बघता-बघता त्याने बॉलिवूडमध्ये तीस वर्षही पूर्ण केले आहेत.

 

बॉलिवूडमध्ये सगळ्यांत महागडा अभिनेता म्हणून अक्षय ओळखला जातो. सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीतही अक्षय आघाडीवर आहे.मात्र त्याच्यासह करिअरला सुरुवात करणारे कलाकारांना मात्र अक्षयप्रमाणे यश मिळवता आले नाही. 'सौगंध' सिनमात अक्षयची हिरोइन म्हणून झळकलेली शांतीप्रिया आज काय करते कोणालाच तिच्याबाबतीत फारशी माहिती नाही. 

 

लग्नानंतर बॉलिवूडपासून झाली दूर

'सौंगध' सिनेमानंतरही शांतीप्रियाचे स्ट्रगल सुरुच राहिले. अगदी कमी वयात लग्न करुन ती संसारातच रमली.  १९९९ साली शांतीप्रिया सिद्धार्थ रेसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर तिने बॉलिवूडला  राम राम ठोकला. मात्र  2004 साली तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि  कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर आली. शांतीप्रियाला दोन मुलांनादेखील सांभाळायचे होते आणि हा विचार करत तिने 2008 साली कमबॅक केले होते. 'माता की चौकी' आणि 'द्वारकाधीश' यासारख्या मालिकेत तिने काम केले. मात्र यानांतर ती पुन्हा गायब झाली.

अक्षयने जिंतके यश मिळवले तितके यश शांतप्रिया मिळवू शकली नाही. आजही शांतीप्रिया बॉलिवूडपासून दूर आपले खाजगी आयुष्य जगत आहे. ५१ वर्षाची शांतिप्रियाला आज ओळखणेही मुश्किल झाले आहे. वयाप्रमाणे तिच्यात झालेला बदलामुळे तिला ओळखणे कठीण जाते.

 

अक्षय कुमार उडवायचा माझी खिल्ली !

दिलेल्या एका मुलाखतीत तिने अक्षयबद्दल तिचे सेटवरचे किस्से सांगताना सांगितले होते की, ‘सौगंध’ हा अक्षय व माझा पहिला सिनेमा होता. चित्रपटाच्या सेटवर अक्षय माझ्या रंगावरून माझी प्रचंड खिल्ली उडवायचा. अगदी 100 लोकांसमोर तो माझ्या रंगावर विनोद करायचा. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. ‘इक्के पे इक्का’ या सिनेमाच्या सेटवरही तो माझ्या गुडघ्यांवर कमेंट करायचा.

माझे गुडघे स्टॉकिंग्सच्या आतही काळे दिसतात कारण तिथे रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत, असे काय काय तो मला बोलला होता. 100 लोकांसमोर त्याने अशापद्धतीने कित्येकदा माझी खिल्ली उडवली. कदाचित मला दुखवायचा त्याचा इरादा नव्हता. पण मी आतून प्रचंड दुखावले गेले होते.

टॅग्स :अक्षय कुमार