Join us  

ती माझ्यासाठी हॅपी बर्थ डे गात असेल..., आईच्या आठवणीत अक्षय कुमारची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 12:48 PM

दरवर्षी अक्षय आईसोबत वाढदिवस साजरा करायचा. पण यावर्षी पहिल्यांदाच त्याच्या वाढदिवशी त्याची आई त्याच्यासोबत नाहीये...

ठळक मुद्देअरूणा भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अशात आईची प्रकृती गंभीर आहे हे कळताच अक्षय सोमवारी सकाळी ब्रिटनहून मुंबईला परतला होता.

अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) सध्या दु:खाचा डोंगर कोसळलाय. आज 9 सप्टेंबरला अक्षयचा वाढदिवस. पण त्याआधीच काल 8 सप्टेंबरला अक्षयची आई अरूणा भाटिया ( Aruna Bhatia) यांचं निधन झालं. लेकाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच माऊलीनं जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनामुळं अक्षय कोलमडला आहे. आज वाढदिवसाला त्यानं एक भावुक पोस्ट शेअर केली.अक्षयनं इन्स्टाग्रामवर आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आई त्याला पे्रमानं कवटाळून त्याच्या गालाचं चुंबन घेतेय. हा फोटो शेअर करत, अक्षय लिहितो, ‘असं व्हावं अशी कधीच इच्छा नव्हती. पण आई जिथं कुठं असेल तिथं माझ्यासाठी हॅपी बर्थ डे सॉन्ग गात असेल. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि सांत्वनासाठी आभार. आयुष्य चालतं राहतं....’

दरवर्षी अक्षय आईसोबत वाढदिवस साजरा करायचा. पण यावर्षी पहिल्यांदाच त्याच्या वाढदिवशी त्याची आई त्याच्यासोबत नाहीये.

अक्षय आईच्या खूप जवळ होता. आईच्या सेवेची एकही संधी तो सोडायचा नाही. 2015 साली एका मुलाखतीत अरूणा भाटिया अक्षयबद्दल भरभरून बोलल्या होत्या. ‘लहानपणापासूनच अक्षय माझी मदत करतो. अगदी भांडी घासण्यापासून तर धुणी धुण्यापर्यंत तो मला मदत करायचा. त्यावेळी नोकर ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती. तेव्हा अक्षय मला घरकामात मदत करायचा.’

अरूणा भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अशात आईची प्रकृती गंभीर आहे हे कळताच अक्षय सोमवारी सकाळी ब्रिटनहून मुंबईला परतला होता. शूटींग अर्धवट सोडून तो आईला भेटायला पोहोचला होता. माझ्या आईसाठी प्रार्थना करा, अशी भावुक पोस्टही त्यानं शेअर केली होती.  तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे, अशी पोस्ट त्यानं केली होती. मात्र काल सकाळी आईच्या निधनाची बातमीच त्याला मिळाली.   सोशल मीडियावर त्यानं चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती. ‘ती माझा आधार होती आणि आज मला असह्य दु:ख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसºया जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. या दु:खप्रसंगी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती,’ अशा शब्दात अक्षयनं आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली होती.     

टॅग्स :अक्षय कुमार