अक्षयकुमारला केपटाऊन येथे भेटला त्याचा जुना मित्र, मुलगी निताराने केली त्याच्यासोबत धमालमस्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 19:19 IST
अक्षयकुमार एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे, यात काहीही शंका नाही. कारण तो त्याच्या कामाबरोबरच आपल्या फॅमिलीलाही पुरेसा वेळ देण्याचा ...
अक्षयकुमारला केपटाऊन येथे भेटला त्याचा जुना मित्र, मुलगी निताराने केली त्याच्यासोबत धमालमस्ती!
अक्षयकुमार एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे, यात काहीही शंका नाही. कारण तो त्याच्या कामाबरोबरच आपल्या फॅमिलीलाही पुरेसा वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतो. अक्षय यावर्षी न्यू ईअर सेलिब्रिशनसाठी आपल्या परिवारासमवेत केपटाऊनला गेला आहे. याठिकाणी पोहोचताच त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला. अक्षयनेच याबाबतची माहिती त्याच्या ट्विटर अकाउंटवरून दिली. यावेळी अक्षयने ट्विटरवर मुलगी नितारासोबत त्याच्या या चिमुकल्या मित्राचा एक फोटोही शेअर केला. फोटोमध्ये नितारा अक्षयच्या या खास मित्रासोबत धमालमस्ती करताना दिसत आहे. तर दुसºया एका फोटोमध्ये अक्षय मित्र व्हलेंटिनो (valentino) याच्यासोबत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय आपल्या परिवारासमवेत मुंबई विमानतळावर बघावयास मिळाला होता. तो यंदा न्यू ईअर मुंबईमध्ये नव्हे तर केपटाऊन या सुंदर शहरात सेलिब्रेट करणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षी अक्षयने त्याच्या या खास मित्राची ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी भेट घालून दिली होती. यावर्षीदेखील जेव्हा तो आपल्या या मित्राला भेटला तेव्हा त्याच्यातील आनंद तो चाहत्यांबरोबर व्यक्त केल्याशिवाय राहू शकला नाही. यावेळेस तर अक्षयची मुलगी नितारादेखील आपल्या या खास मित्रासोबत एन्जॉय करताना दिसली. तिने त्याच्यासोबत चांगलीच धमालमस्ती केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अक्षयने त्याच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. तो काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सितारा हॉटेलमध्ये आपल्या टीमसोबत बघावयास मिळाला होता. केपटाऊन येथे सुट्या एन्जॉय केल्यानंतर अक्षय त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. या चित्रपटाची निर्माता ट्विंकल खन्ना असून, अक्षय यामध्ये एका दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कितपत मजल मारेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर अक्षय त्याच्या आगामी ‘रोबोट-२’मुळेही प्रचंड चर्चेत आहे.