Join us  

तो कॉल आला अन् अक्षय कुमारनं एक ब्लॉकबस्टर सिनेमा हातचा गमावला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 4:59 PM

तर या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे झाला असता अक्षय कुमारचा डेब्यू...!

ठळक मुद्दे1993 साली रिलीज झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमासाठीही अक्षयने ऑडिशन दिलं होतं. मात्र ऑडिशनमध्ये त्याला रिजेक्ट केलं गेलं व ही भूमिका दीपक तिजोरीला दिली गेली.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार  (Akshay Kumar )आज 54 वर्षांचा झाला. 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेल्या अक्षयने ‘सौगंध’ सारख्या सुपरफ्लॉप चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती. पण आज हाच अक्षय सुपरस्टार म्हणून मिरवतो. 25 जानेवारी 1991 रोजी अक्षयने ‘सौगंध’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण अक्षयचा हा पहिलाच सिनेमा दणकून आपटला. फार क्वचित लोकांना ठाऊक असावं की, ‘सौगंध’ या सिनेमाआधी अक्षयला एक ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफर झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं, ‘फुल और कांटे’. पण कदाचित हा सिनेमा अक्षयच्या नशीबात नसावा.  ‘फुल और कांटे’ची तयारी चालवली असताना एका रात्री त्याला एक फोन आला आणि क्षणात त्याच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.

अक्षयने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला. अगदी रोलसाठी निर्मात्यांच्या पाय-या झिजवल्या. अशात  ‘फुल और कांटे’ मिळाला. पण हा सिनेमा मिळाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही.होय, अजय देवगणचा ब्लॉकबस्टर ‘फुल और कांटे’ हा सिनेमा सर्वप्रथम अक्षयला ऑफर झाला होता. मात्र अक्षयला ऐनवेळी या सिनेमात रिप्लेस करण्यात आलं होतं.अक्षयने स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.  त्याने सांगितलं होतं  की, ‘फुल और कांटे हा सिनेमा मला मिळाला होता. या सिनेमाच्या सॉन्ग मेकिंग, फोटोशूटला मी हजर होतो. एकदिवस मी नदीम-श्रवणसोबत माझं म्युझिक सेशन सुरू होतं.  शूटींगची तयारी सुरु केली होती. याचदरम्यान एक कॉल आला आणि उद्या सकाळी शूटींगला येऊ नकोस, असं थेट मला सांगण्यात आलं.’

अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवून ऐनवेळी अजय देवगणला या सिनेमात घेण्यात आलं होतं.  हा सिनेमा अक्षयला मिळाला असता तर तो त्याचा डेब्यू सिनेमा ठरला असता. यानंतर अक्षयने ‘सौगंध’मधून डेब्यू केला. पण तो दणकून आपटला.

1993 साली रिलीज झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमासाठीही अक्षयने ऑडिशन दिलं होतं. मात्र ऑडिशनमध्ये त्याला रिजेक्ट केलं गेलं व ही भूमिका दीपक तिजोरीला दिली गेली.  1994 साली मात्र अक्षयच्या नशीबानं अचानक कलाटणी घेतली. त्याला धडाधड नवे सिनेमे ऑफर होऊ लागलेत. या एका वर्षांत त्याचे एक-दोन नाही तर तब्बल 12 सिनेमे रिलीज झाले होते. 1991 ते 2000 पर्यंत अक्षयने 42 सिनेमे केले होते. यातील 12 सिनेमे हिट झाले होते.

टॅग्स :अक्षय कुमारअजय देवगण