Join us  

क्रिती सनॉनसाठी अक्षय कुमार बनला फोटोग्राफर, क्लिक केलेला फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 6:01 PM

Akshay kumar turns photographer for krit Sanon bachchan pandey set : क्रितीचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनने स्वत: चा एक फोटो तिच्या इस्टाग्रामवर शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करताना तिने सांगितले आहे की, अभिनेता अक्षय कुमारने तिचा हा फोटो क्लिक केला आहे.

क्रितीने इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. क्लोजअप शॉट फोटोमध्ये क्रितीचा फक्त चेहरा दिसतो आहे.  यात अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला असून त्याबरोबर तिने रेड लिपस्टिक लावली आहे. क्रितीचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करत या अभिनेत्रीने लिहिले, 'बच्चन पांडे अक्षय कुमार जेव्हा फोटोग्राफर होतो ..'.  क्रितीच्या फोटोवर फॅन्स कमेंट करत आहेत. 

बच्चन पांडे’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती  सनॉन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.  अक्षयच्या चित्रपटामध्ये क्रिती महत्त्वपूर्ण भूमिका साकारते आहे.  चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. रिपोर्टनुसार चित्रपटाचे शूटिंग राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुरू आहे.

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून त्याचे दिग्दर्शन फरहाद समाजी करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होईल.

टॅग्स :अक्षय कुमारक्रिती सनॉन