Join us  

बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई, शेअर केला मुलाचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:29 PM

लिजा हेडन दुसऱ्यांदा बनली आई

बॉलिवूड अभिनेत्री लिजा हेडनच्या घरी नवीन पाहुणा दाखल झाला आहे. ती दुसऱ्यांदा आई बनली आहे. लिजाने मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव लिओ ठेवले आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

लिजाने आपल्या दोन्ही मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ते दोघे एकमेकांकडे पाहत आहेत आणि एकमेकांचा हात पकडलेला आहे. हा फोटो शेअर करत लिजाने लिहिले की, या छोट्याशा आशीर्वादाने माझ्या मनाला स्पर्श केला आहे. हे यापूर्वी कधी झाले नव्हते. मी पूर्णपणे निशब्द झाले आहे. तुमच्या दोघांकडे पाहण्यापेक्षा दुसरी इतर कोणतीही जास्त चांगली गोष्ट नाही. मला विश्वास बसत नाही की मी तुमची आई आहे.

लिजाने पुढे लिहिले की, लिओ आणि जॅक. भाऊ आणि माझे नेहमीचे व्हॅलेंटाइन. काल आमच्या भेटीची पाचवे वर्ष होते. १३ फेब्रुवारी, शुक्रवार. त्यानंतर माझे जीवन नेहमीसाठी बदलून केले. त्यासाठी नवऱ्याची मी आभारी आहे. माझ्यासोबत कुटुंब बनविले.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये लिजा हेडने एक फोटो शेअर केला होता आणि सांगितले होते की तिच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. या फोटोत लिजा तिचा नवरा डिनो लालवानी आणि मुलासोबत दिसत होती. तिघे पाण्यात उभे होते.

बॉलिवूडमध्ये लिजाने आयशा चित्रपटातून पदार्पण केले होते. याशिवाय तिने हाऊसफुल ३, द शौकिन्स, क्वीन आणि ए दिल है मुश्कील यासारख्या चित्रपटात काम केले आहे. लिजा हेडन किंगफिशर गर्ल बनली होती. याशिवाय ती बऱ्याच मासिकाच्या कव्हरपेजवर झळकली आहे.

टॅग्स :लीसा हेडनअक्षय कुमार