Join us  

‘गरम मसाला’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी! येणार ‘गरम मसाला2’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 7:31 PM

 १३ वर्षांपूर्वी आलेला ‘गरम मसाला’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती.

 १३ वर्षांपूर्वी आलेला ‘गरम मसाला’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. प्रियदर्शन दिग्दर्शित या विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले होते. हाच अनुभव तुम्हाला पुन्हा एकदा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. होय, जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार हे दोघेही या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येण्याच्या मूडमध्ये आहेत. म्हणजेच येत्या दिवसांत ‘गरम मसाला’च्या चाहत्यांना ‘गरम मसाला पार्ट2’ बघायला मिळू शकणार आहे. एका ताज्या मुलाखतीत जॉनने स्वत: याबाबतचे संकेत दिलेत. मला खरोखर कॉमेडी करायची आहे. लोकांना खूप हसवायचे आहे. काही दिवसांपूर्वीच मी ‘गरम मसाला’ पाहिला आणि तो पाहिल्यानंतर लगेच अक्षय कुमारला फोन केला. ‘गुरूजी, ‘गरम मसाला2’ करू यात,’ असे मी त्याला म्हणलो. अक्षयनेही लगेच होकार दिला. मी व अक्षय एकत्र येऊन हा चित्रपट करू इच्छितो. कदाचित लवकरचं आम्ही याबाबतची घोषणा करू. माझी व अक्षयची चर्चा, डेट्स आणि यानंतरच्या काही आवश्यक गोष्टी मार्गी लागल्याच तर ‘गरम मसाला2’ करण्याची माझी इच्छा पूर्ण होईल, असे जॉन म्हणाला. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे, ती म्हणजे, आपण ‘गरम मसाला’चा सीक्वल पाहण्यासाठी जितके उत्सूक आहोत, तितकेच जॉन व अक्षयही यात काम करण्यास उत्सूक आहेत.तूर्तास जॉन ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात बिझी आहे तर अक्षय कुमार ‘गोल्ड’, ‘हाऊसफुल4’, ‘केसरी’ अशा अनेक चित्रपटांत व्यस्त आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहमअक्षय कुमारसत्यमेव जयते चित्रपट