Join us

​‘2.0’साठी अक्षयने तोडले 25 वर्षांचे व्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:18 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने व्हर्सेटाईल अ‍ॅक्टर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला सर्वांधिक कमाई करणाºया नायकांत ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने व्हर्सेटाईल अ‍ॅक्टर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला सर्वांधिक कमाई करणाºया नायकांत त्याची गणना होते. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘2.0’मध्ये तो खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत केली असून त्याने मागील 25 वर्षांत जे काम केले नाही ते ‘2.0’साठी करावे लागले आहे. या चित्रपटात अक्षय प्रथमच प्रोस्थेटिक मेकअप केलेला दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘2.0’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी यात अक्षय साकारत असलेली भूमिका पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. यावेळी रजनीकांत यांनी या चित्रपटाचा मी नायक नसून खरा नायक अक्षय आहे, कारण त्याने या चित्रपटासाठी केलेली मेहनत प्रशंसनीय आहे. अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये पर्दापण केल्यापासून कोणत्याही चित्रपटासाठी एवढा मेकअप केलेला नाही हे विशेष. अक्षय म्हणाला, मी आजपर्यंत कोणत्याच चित्रपटासाठी फारसा मेकअप केला नव्हता. मात्र ‘2.0’साठी मला एवढा मेकअप करावा लागला की, त्याची तुलना मी 25 वर्षांचा एकत्र मेकअप असा करेल. माझा मेकअप करण्यासाठी 3 तास लागायचे, मेकअप करतेवेळी मी अनेक चित्रपट पाहीले. शूटिंग संपल्यावर हा मेकअप उतरविण्यासाठी 1 तास लागायचा. मी सहनशील व्यक्ती आहे. मात्र ‘2.0’चे चित्रीकरण करताना माझी सहनशीलतेत वाढ झाली, असेही अक्षय म्हणाला. रजनीकांत याची प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यात रजनीकांतची तिहेरी भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षय कुमारसह अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनची देखील यात महत्त्वाची भूमिका आहे.