Join us  

अक्की करतो गोमूत्र प्राशन!, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:17 AM

बीअर ग्रेल्स आणि हामा कुरेशी यांच्याशी चॅट करताना या अभिनेत्याने आपण दररोज गोमूत्र प्राशन करीत असल्याचे उघड केले.

मुंबई : अक्षयकुमार हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या तारुण्याचे श्रेय अक्षयकुमार नेहमीच आपल्या पोषक आहार आणि नियमित व्यायामाला देतो. मात्र नुकत्याच इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये या ५३ वर्षीय अभिनेत्याने त्याच्या उत्तम आरोग्याच्या रहस्याचे एक अजब कारण उलगडले. मात्र त्याचे हे कारण नेटीझन्सना अजिबात आवडले नाही. बीअर ग्रेल्स आणि हामा कुरेशी यांच्याशी चॅट करताना या अभिनेत्याने आपण दररोज गोमूत्र प्राशन करीत असल्याचे उघड केले.जेव्हा ‘बेलबॉटम’मधील एका अभिनेत्रीने अक्षयला विचारले की, एका शोमध्ये तुला हत्तीच्या विष्ठेपासून तयार केलेला चहा पिताना कसे वाटले? त्यावर अक्षय म्हणाला, ‘मी त्यासाठी अतिशय एक्साईट होतो. मला काहीच चिंता नव्हती. कारण आयुर्वेदिक लाभांसाठी मी दररोज गोमूत्र प्राशन करतो. त्यामुळे मी ते सहज खाऊ शकलो.’अक्षय याबाबत बिनधास्तपणे बोलला खरा, तर दुसरीकडे त्याच्या या खुलाशाने त्याचे फॅन मात्र भलतेच नाराज झाले आणि त्यांनी ‘ऐतराज’मधील या अभिनेत्याला ट्विटरवर चांगलेच ट्रोल करायला सुरुवात केली.जनावरांची विष्ठा खाऊन प्रेक्षकांसमोर बकवास कॉमेडी करणे हे छान आहे, असेही एकाने त्याला उपहासाने सुनावले. तर दुसऱ्याने ‘कदाचित अक्षयला ठाऊक नसेल की तो जे काही पितो त्यापेक्षा अधिक उपयुक्त असे दूधही गाय देते, अशी टिप्पणी केली.

टॅग्स :अक्षय कुमार