Join us  

OMG! ‘कंचना 2’च्या रिमेकची कथा लीक, अक्षय कुमारला सतावणार ‘ट्रान्सजेंडर’ भूत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 2:52 PM

अक्षय कुमार त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत असतो. लवकरच अक्षय ‘कंचना 2’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. पण तूर्तास ‘लक्ष्मी’ बद्दल एक ताजी बातमी आहे.

ठळक मुद्देशबीना खान आणि तूषार कपूर ‘लक्ष्मी’ प्रोड्यूस करणार आहेत. राघव लॉरेन्स या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे.

अक्षय कुमार त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत असतो. लवकरच अक्षय ‘कंचना 2’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. या चित्रपटासाठी हिरोईनही फायनल झाली आहे. सूत्रांचे मानाल तर ‘कंचना 2’च्या रिमेकसाठी कियारा अडवाणीचे नाव फायनल केले गेले आहे. अभिनेता आर. माधवन यालाही या चित्रपटाची आॅफर मिळाली आहे. पण तूर्तास ‘लक्ष्मी’ बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, शूटींग सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये थोडा बदल करण्यात आल्याचे कळतेय. ओरिजनल फिल्मचा हिरो थोडा भित्रा आहे. पण ‘लक्ष्मी’मध्ये अक्षयची व्यक्तिरेखा नीडर असणार आहे. ज्याचा भूताखेतांवर जराही विश्वास नाही. पण अचानक एका ‘ट्रान्सजेंडर’ भूताची पीडा त्याला होते. अक्षयला हे भूत झपाटते.

चित्रपटात कियारा अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘कंचना 2’मध्ये हिरोची आई आणि वहिणी महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. पण रिमेकमध्ये कियारा म्हणजे, हिरोची पत्नी महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे.

अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून ‘कंचना’ची स्क्रिप्ट आवडली होती आणि त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी त्याने होकार दिला होता. अर्थात गेल्या वर्षभर अतिशय बिझी असल्यामुळे अक्षयचा हा रिमेक थंडबस्त्यात पडला. पण आता रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हातावेगळा करताच अक्षय या रिमेकचे काम सुरु करणार आहे. आधी या रिमेकमध्ये शोभिता धूपिया दिसणार, अशी खबर होती. शोभिता सैफ अली खानसोबत ‘शेफ’मध्ये दिसली होती. शबीना खान आणि तूषार कपूर ‘लक्ष्मी’ प्रोड्यूस करणार आहेत. राघव लॉरेन्स या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. राघव यांनीच ‘कंचना’चे दिग्दर्शन केले होते.

टॅग्स :अक्षय कुमार