Join us  

Akash Ambani Wedding: आकाश अंबानीच्या लग्नात दिसला करण जोहर-हार्दिक पांड्याचा ‘दोस्ताना’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 10:42 AM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटामाटात पार पडला. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, करण जोहर असे सगळे या लग्नात सहभागी झालेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटामाटात पार पडला. गत रात्री मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, करण जोहर असे सगळे या लग्नात सहभागी झालेत. केवळ इतकेच नाही तर वरातीत व-हाडी बनून नाचलेही. या वरातीत करण आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा ‘दोस्ताना’ही यावेळी दिसला.

दोघांनीही वरातीत चांगलाच ठेका धरला. सोशल मीडियावर आकाश अंबानीच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यापैकीच करण व हार्दिक पांड्याच्या या व्हिडीओचाही समावेश आहे.

‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अलीकडे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली आणि या शोने नवा वाद ओढवून घेतला होता. हार्दिक आणि के. एल. राहुल या दोघांनी या एपिसोडमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केलीत होती आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवरही प्रचंड टीका झाली होती. सोशल मीडियाने हार्दिक व के. एल. राहुल यांना फैलावर घेतले होते. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, हार्दिक पांड्या व के. एल. राहुलवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई करत त्यांना आॅस्ट्रेलिया दौ-यातून माघारी बोलावले होते. हे प्रकरण अंगलट आल्याचे पाहताच हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली होती.

टॅग्स :आकाश अंबानी लग्नकरण जोहरहार्दिक पांड्या