Join us  

Akash Ambani Wedding: आकाश अंबानीच्या लग्नाचा थाटच न्यारा...! पाहा, व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 11:19 AM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटामाटात पार पडला. या लग्नाचा थाट पाहून अनेकांचे डोळे दिपले.

ठळक मुद्देभरगच्च फुलांची आरास, फटाक्यांची आतीषबाजी, दिव्यांची रोशनाई, दिग्गजांची उपस्थिती अशा थाटात हा विवाह सोहळा रंगला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटामाटात पार पडला. गत रात्री मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘चार चांद’ लावलेत. या लग्नाचा थाट पाहून अनेकांचे डोळे दिपले.भरगच्च फुलांची आरास, फटाक्यांची आतीषबाजी, दिव्यांची रोशनाई, दिग्गजांची उपस्थिती अशा थाटात हा विवाह सोहळा रंगला. तूर्तास या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

लग्नमंडपात मुकेश अंबानी- नीता अंबानी यांनी ग्रॅण्ड एन्ट्री घेतली.   मुकेश व नीताच्या मागे मुलगी ईशा व जावई आहेत. तर त्यांच्या मागे अनंत अंबानी दिसतोय.

आकाश व श्लोकाचा लग्नमंडप इतका सुंदर सजवला होता की, पाहणाºयाची नजर खिळावी. या लग्नमंडपाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नववधू श्लोका मेहता हिची एन्ट्रीही ग्रॅण्ड होती. त्याचा व्हिडिओही पाहण्यासारखा आहे. 

काल लग्नाच्या आणाभाका घेत, पती - पत्नीच्या नात्यात अडकलेले आकाश व श्लोका यांनी धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्लोका विदेशात गेली. २००९ मध्ये अमेरिकास्थित न्यूजर्सी प्रिंसटन युनिव्हर्सिटीत तिने प्रवेश घेतला. पुढे द लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून कायद्यात मास्टर्स केले.  यानंतर २०१४ मध्ये तिने रोसी ब्लू फाऊंडेशनमध्ये डायरेक्टर पद स्वीकारले. श्लोका कनेक्ट फॉर नामक संस्थेची को-फाऊंडरही आहे. ही संस्था एनजीओंची मदत करते. श्लोका मेहता ही हिºयांचे व्यापारी रसेल मेहता यांची सर्वात लहान मुलगी आहे.

टॅग्स :आकाश अंबानी लग्न