Join us  

AK vs AK Trailer: एअरफोर्सच्या नाराजीनंतर अनिल कपूरने मागितली माफी, नेटफ्लिक्सही झुकलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 8:57 AM

अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या नव्या AK vs AK सिनेमाच्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय वायुसेनेने काही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर अनिल कपूर म्हणाले की, त्यांचा किंवा निर्मात्यांचा उद्देश लोकांच्या भावना दुखावण्याचा नव्हता. या सिनेमातील एका सीनमध्ये IAF ची वर्दी घालून अनिल कपूर शिव्या देतात. यावरून अनिल कपूर यांनी एका व्हिडीओ जारी करून भारतीय वायुसेनेची माफी मागितली आहे. अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे आणि २४ डिसेंबरला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

वायुसेनेने घेतलेल्या आक्षेपावर माफी मागताना अनिल कपूर म्हणाले की, 'हे माझ्या लक्षात आलं आहे की, माझ्या AK vs AK सिनेमाच्या ट्रेलरने काही लोकांची मने दुखावली आहेत. जसे की मी अस्वाभाविक भाषेचा वापर करताना भारतीय वायुसेनेची वर्दी घातली आहे. माझा किंवा आमचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. यासाठी मी माफी मागतो. मला फक्त काही संदर्भ सांगायचे आहेत जेणेकरून काही गोष्टी यात कशा आल्या हे तुम्हाला कळावं. सिनेमात माझ्या भूमिकेने वर्दी घातली आहे. कारण तो एक अभिनेता आहे, जो एका अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जेव्हा त्याला समजतं की, त्याच्या मुलीचं अपहरण झालं तेव्हा तो या भाषेचा वापर करतो'. 

नेटफ्लिक्सनेही जारी केलं स्पष्टीकरण

नेटफ्लिक्सनेही यावरून त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट लिहिली आहे की, त्यांचा भारतीय वायुसेनेचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. नेटफ्लिक्सने हे स्पष्ट केलं की, देशाची रक्षा करणाऱ्या बहादूर जवानांना ते सर्वोच्च सन्मानाच्या दृष्टीने बघतात.

AK vs AK सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यावर वायुसेनेने एका ट्विटमध्ये म्हटले होते की, 'या व्हिडीओत अनिल कपूरला वायुसेनेची वर्दी चुकीच्या पद्धतीने घातलेली दाखवलं आहे आणि ज्या भाषेचा वापर केला आहे तोही चुकीचा आहे. सेनेत अशाप्रकारचं वागणं नियमांच्या विरोधात आहे आणि हा सीन सिनेमातून काढून टाकण्याची गरज आहे'. 

टॅग्स :अनिल कपूरअनुराग कश्यपभारतीय हवाई दल