Join us  

'छपाक' पेक्षा 'तान्हाजी' ने केले बॉक्‍स ऑफिसवर तगडं कलेक्शन, ओपिनंगलाच केली इतक्या कोटींची केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:28 AM

'छपाकला' भारतात 1700 तर परदेशात 460 एकूण २१६० स्क्रीन मिळाले असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तान्हाजी इतकी नसली तरी चांगली कमाई करण्यात यश संपादन केले आहे.  

अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर सिनेमा 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. 

दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. दीपिकाचा जेएनयूमध्ये जाऊन तेथे  विद्यार्थांना  दिलेले समर्थनही रसिकांना चांगलेच खटकले. याचाच परिणाम सिनेमावर झाला. त्यामुळे सिनेमाची दमदार कथा असूनही रसिकांनी मात्र छपाककडे पाठ फिरवली. परिणामी अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग छपाकला मिळाले. 'छपाकला' भारतात 1700 तर परदेशात 460 एकूण २१६० स्क्रीन मिळाले असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तान्हाजी इतकी नसली तरी चांगली कमाई करण्यात यश संपादन केले आहे.  तसेच 'राजस्थान', 'मध्य प्रदेश', 'छत्तीसगढ़' आणि इतर ठिकाणी हा सिनेमा टॅक्स फ्री  करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्या कलेक्शनमध्येही वाढ होणार असल्याची चिन्ह आहेत. 

तर दुसरीकडे रसिकांनी 'तान्हाजी' सिनेमाला पहिली पसंती देत छपाककडे पाठ फिरवली. या सिनेमाला  4540  स्क्रीन्स मिळाले. 'तान्हाजी' प्रदर्शित होताच या सिनेमाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले. या सिनेमाने 16 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत  हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेच दिसतंय. दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेला  'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :तानाजी