Join us  

अडचणीत असलेल्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आला अजय देवगण, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 4:13 PM

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाचे निर्माता विनय सिन्हा यांची मुलगी प्रीती सिन्हा  हिने मधू मंतेना याच्यासोबत काम करण्यास नकार ...

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाचे निर्माता विनय सिन्हा यांची मुलगी प्रीती सिन्हा  हिने मधू मंतेना याच्यासोबत काम करण्यास नकार देत विकास बहल यांच्यासोबत जाणे पसंत केले. स्पॉटबॉय या वेबसाइटनुसार, ‘फॅटमबॉय’ मधू मंतेना रात्रीच प्रीतीच्या घरी गेला अन् तिच्या घराची डोरबेल वाजविली. मधू मंतेनाने प्रीतीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने घराचा दरवाजा उघडला नाही. उलट मधू मंतेनाच्या या प्रकारामुळे प्रीतीला खूप टेन्शन आले अन् तिने भाऊ अजय देवगणशी संपर्क साधला. ही बाब फार कमी लोकांना माहिती आहे की, प्रीती अजयला दरवर्षी राखी बांधत असून, ती त्याची मानलेली बहीण आहे. त्यामुळेच तिने थेट अजयला फोन केला. मध्यरात्री प्रीतीने अजयला फोन करून संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. यावेळी प्रीतीने म्हटले की, आनंद कुमार यांच्यावर बनत असलेल्या ‘सुपर-३०’ या बायोपिकवर कसा कब्जा केला गेला आणि अक्षयकुमारऐवजी हृतिक रोशनला कशी संधी दिली गेली, हे सर्व काही सांगितले. आता तुम्ही विचार करीत असाल की हे सर्व ऐकल्यानंतर अजय देवगणने हे प्रकरण कसे हाताळले असेल? मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अजयने या प्रकरणात काहीही केले नसले तरी, तो यावर बहिणीची बाजू भक्कमपणे मांडणार असल्याचे समजते. त्याचबरोबर भावाकडे सर्व प्रकार सांगितल्याने प्रीतीच्या मनातील राग कमी झाला असून तिने हे सर्व प्रकरण आता अजयवर सोपविले आहे. आता अजय हे सर्व प्रकरण कसे हाताळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. <6br />वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास नुकताच रिलीज झालेला अजय देवगणचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट अजूनही बॉक्स आॅफिसवर आपला जलवा दाखवित आहे. आतापर्यंत या चित्रपटाने दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविला आहे. गोलमाल सिरीजचा हा चौथा चित्रपट असून, हा एक कॉमेडीपट आहे. चित्रपटात अजय देवगणसह अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, परिणिती चोपडा, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.