Join us

अजय देवगणने Thank God' या आगामी सिनेमाची केली घोषणा, ही असणार स्टारकास्ट

By गीतांजली | Updated: January 7, 2021 16:56 IST

अजय देवगणने आपला आगामी सिनेमा 'थँक गॉड'ची घोषणा केली आहे.

अजय देवगणने आपला आगामी सिनेमा 'थँक गॉड'ची घोषणा केली आहे. अजय देवगणच्या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत देखील दिसणार आहेत. या सिनेमाचे शूटिंग जानेवारीमध्येच सुरू होणार आहे.

सिनेमाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा ​​पहिल्यांदा अजय देवगणच्यासोबत दिसणार आहे, तर रकुल प्रीतसोबत अजय देवगणचा तिसरा सिनेमा असेल.

अजय देवगणने ट्विट करून आपल्या सिनेमाची घोषणा केली आहे. अजयने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'थँक गॉड' या माझ्या पुढच्या सिनेमाची घोषणा करण्यात मला आनंद झाला आहे, ज्यात थोडासा कॉमेडीही आहे.'  या पोस्टमध्ये त्याने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत या सिनेमातील अन्य कलाकारांना ही टॅग केले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रानेही सोशल मीडियावर या नव्या चित्रपटाची माहिती शेअर केली आहे.  ट्विट करून अजय देवगणसोबतच्या पहिल्या चित्रपटाविषयी त्याने उत्साह दाखविला आहे.

अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा 2021मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय देवगण फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारेल. रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्ण काळ म्हणवल्या जाणा-या १९५२ ते १९६२ हा १० वर्षांचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाईल. 

टॅग्स :अजय देवगण