Join us

ऐश्वर्या- अभिषेक मालदिवमध्ये करतायेत हॉलिड एन्जॉय, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:34 IST

अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्यसोबत मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. ऐश्वर्या रायने मालदिवचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठळक मुद्देअभिषेक साहिर लुधियानवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहेअभिषेक-ऐश्वर्या सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतायेत.

अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्यसोबत मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. ऐश्वर्या रायने मालदिवचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर एॅश नेहमीच अॅक्टिव्ह असते. गोव्याच्या हॉलिडेचे फोटो देखील ऐश्वर्याने शेअर केले होते.   

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अभिषेक संजय लीला भन्साळींनी यांच्या साहिर लुधियानवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन- प्रियंका चोप्राची जोडी दिसणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. नंतर पीसीने अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिल्याचे म्हटले गेले. त्यामुळे तिच्या नकारानंतर या बायोपिकमध्ये अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनची वर्णी लागली असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर यात सिनेमात तापसी पन्नूची वर्णी लागली आहे.  

ऐश्वर्याचा २०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

आता ऐश्वर्याला एका हॉलिवूड सिनेमाची ऑफर आली आहे आणि हा हॉलिवूड प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी तिने एक टीमही हायर केल्याचे कळतेय.आत्तापर्यंत तिने हॉलिवूडच्या पाच चित्रपटांत काम केले आहे. ब्राईड अ‍ॅण्ड प्रिज्युडिस, द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेज, प्रोवोक्ड, द लास्ट लीजन आणि द पिंक पँथर -2 मध्ये ऐश्वर्या झळकली आणि बघता बघता एक आंतरराष्ट्रीय चेहरा बनली. ताज्या हॉलिवूड चित्रपटाला ऐश्वर्याने होकार दिला आहे. सगळे काही जमून आले तर यावर्षा अखेरिस या हॉलिवूडपटाची घोषणा होणे अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन