Join us  

ऐश्वर्या राय-बच्चनची डुप्लिेकट असलेल्या ‘या’ मॉडेलची सोशल मीडियावर धूम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 4:03 PM

सध्या सोशल मीडियावर इराणी मॉडेल महलाघा जबेरी हिच्या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. २८ वर्षीय महलाघा एवढी सुंदर आहे की, ...

सध्या सोशल मीडियावर इराणी मॉडेल महलाघा जबेरी हिच्या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. २८ वर्षीय महलाघा एवढी सुंदर आहे की, बरेचसे फॉलोवर्स तिची तुलना चक्क विश्वसुंदरी राहिलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनशी करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर अनेकांच्या मते ही ऐश्वर्या रायची डुप्लिकेट आहे. महलाघा हिचा जन्म १७ जून १९८९ मध्ये इराणमधील इस्फहानमध्ये झाला. सध्या महलाघाच्या सौंदर्याची चर्चा इंटरनेटवर जबरदस्त रंगत आहे. तिचे बरेचसे फोटोज् सोशल मीडियावर धूम उडवून देत असून, भारतीय चाहत्यांमध्येही तिच्याबद्दल प्रचंड क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महलाघा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे योग करीत असते. एका मुलाखतीत महलाघाने सांगितले की, योगामुळे मला केवळ परफेक्ट फिगरच मिळाला नसून, मनाच्या शांतीकरिताही योग फायदेशीर ठरत आहे. २.३ मिलियन फॉलोअर्स असलेली महलाघा सध्या मॉडलिंग क्षेत्रात नशीब अजमावत आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. त्यामुळेच केवळ इन्स्टाग्रामवरच महलाघाचे २.३ मिलियन म्हणजेच २३ लाख फॉलोअर्स आहेत. महलाघाचा जन्म इराणमध्ये झाला, परंतु मॉडलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती अमेरिकेतील सॅनडिएगोमध्ये राहते. ५ फूट ८ इंच एवढी हाइट असलेली महलाघा सध्या फॅशन डिझायनर्सची फस्ट चॉइस आहे. आतापर्यंत तिने वॉल्ट मेन्डेज, मिस होली क्लोदिंगसाठी मॉडलिंग केली आहे. महलाघाला मॉडलिंग व्यतिरिक्त घोडस्वारीचाही प्रचंड छंद आहे. याबाबत ती सांगते की, रिकाम्या वेळेत घोडस्वारी आणि शॉपिंग करायला मला खूप आवडते. त्याचबरोबर चित्रपटांबद्दलही मला एक वेगळेच आकर्षण आहे. तिला इंग्रजी रोमॅण्टिक आणि साइंटिक फिक्शन चित्रपट बघायला आवडतात. २००९ मध्ये महलाघाने ट्विटरवर एंट्री केली. ट्विट माध्यमातून तिने एक राजकीय वक्तव्य केले होते. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान, महलाघाचे बरेचसे हॉट फोटो सोशल मीडियावर धूम उडवून देत आहेत.