Join us  

ऐश्वर्या राय बच्चनचे ४ वर्षानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक, 'पोन्नियिन सेलवन'मधील अभिनेत्रीचा लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 2:01 PM

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चन या वर्षी मोठ्या पडद्यावर तब्बल चार वर्षानंतर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या वर्षी मोठ्या पडद्यावर तब्बल चार वर्षानंतर पुनरागमन करत आहे. ऐश्वर्या मणिरत्नमच्या PS1 म्हणजेच 'पोन्नियिन सेलवन'मध्ये दिसणार आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी नावाची पात्र साकारत आहे, जी पझुवूरची राणी आहे.

'पोन्नियिन सेलवन' चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनचा लूकमधील पोस्टर बुधवारी रिलीज करण्यात आले. चित्रपटाची निर्माता कंपनी लायका प्रॉडक्शनने ती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. मात्र, चेहरा थोडा गंभीर आहे. पोस्टर शेअर करत लिहिले आहे- सूडाचा चेहरा सुंदर आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मद्रास टॉकीजने लायका प्रॉडक्शनच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचे संगीत ए आर रहमानने दिले आहे. हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट असून दोन भागात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कल्कीच्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारीत आहे. दहाव्या शतकातील चोल राजवंशाला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची कथा विणली आहे. यात सिंहासनाच्या वेगवेगळ्या वारसांमधील संघर्ष दर्शविला जाईल. या चित्रपटात विक्रम, जयम रवी, कार्ती आणि शोभिता धुलिपाला देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम चोल वंशाचा युवराज आदित्य करिकलनच्या भूमिकेत आहे. त्याच वेळी, कार्ती एक गुप्तहेर आणि शूर योद्धा वंथियाथेवनच्या भूमिकेत आहे. 

ऐश्वर्या राय बच्चन वर्कफ्रंट या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या चार वर्षांनी पडद्यावर परतणार आहे. ती शेवटची फन्ने खानमध्ये झळकली आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. याआधी ऐश्वर्या २०१६ मध्ये आलेल्या ए दिल है मुश्किल या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील तरुण रणबीरसोबतची तिची केमिस्ट्री खूप चर्चेत होती.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनमणी रत्नम