Join us  

सुशांत सिंग राजपूतवर विषप्रयोग झाला का?; दहा दिवसांत होणार मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 2:55 PM

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवं खुलासे होतायेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवं खुलासे होतायेत. याच दरम्यान एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या पोस्टपोर्टम रिपोर्टला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एम्सच्या टीमने सुशांतचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांकडून गळ्याभवती असणाऱ्या खुणांबाबत चौकशी केली आहे. E 24 च्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या गळ्याभोवती ज्या खूण होत्या त्यावरुन ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संभय व्यक्त होतोय. 

E24च्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने एम्सच्या फॉरेन्सिक टीमला सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुन्हा रिइन्वेस्टिगेट करायला सांगितले होते. या रिपोर्टच्या विश्लेषण केल्यानंतर एम्सच्या टीमने सादर केलेला रिपोर्ट पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.  तसेच आता एम्सच्या डॉक्टरांची टीम सुशांतच्या विसारा टेस्ट करुन त्याला विषारी पदार्थ देण्यात आला आहे का?, याचा शोध घेणार आहेत. एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, फॉरेन्सिक बोर्ड विषाची तपासणी करण्यासाठी विसरा टेस्ट करत आहे. 10 दिवसांमध्ये याचा रिपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

सुशांत पूर्णपणे ड्रग्सच्या आहारी गेला होता, युरोप दौऱ्यावर असतानाही केवळ ड्रग्स मिळत नसल्याने तो युरोपवरुन परतला होता. सुशांतच्या फार्म हाऊसवर नेहमी पार्ट्या होत असे. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारमंडळी येत असले. सर्वजण ड्रग्सचं सेवन करत असं रियाने म्हटलं आहे. रियाचा भाऊ शौविक आणि मिरांडालाही अटक शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यानंतर शौविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.

संदीप सिंहने सुशांतसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स केले शेअर, म्हणाला - 'मला माफ कर भावा...' 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती