'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)च्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. तपासात असे दिसून आले आहे की, अभिनेत्री तिच्या मृत्यूपूर्वी अनेक वर्षे अँटी एजिंग मेडिसन घेत होती. मात्र, असे म्हटले जात आहे की या औषधांचा तिच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही. दरम्यान, अभिनेत्री मल्लिका शेरावतने तरुण दिसण्यासाठी कृत्रिम प्रक्रिया टाळण्याचा सल्ला दिला आहे.
मल्लिका शेरावतने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती मेकअपशिवाय नॅचरल लूकमध्ये दिसत आहे. ती व्हिडीओमध्ये म्हणते, 'मी कोणताही फिल्टर वापरला नाही, कोणताही मेकअप केला नाही, माझे केसही विंचरले नाहीत. मी हे पहिल्यांदाच करत आहे.'
''फिलर्सला नाही म्हणा...''मल्लिका शेरावत पुढे म्हणाली, ''मी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे जेणेकरून आपण एकत्रितपणे बोटॉक्सला नाही, कृत्रिम कॉस्मेटिक फिलरला नाही, जीवनाला हो आणि निरोगी जीवनशैलीला हो म्हणू शकू.'' व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये, अभिनेत्रीने लोकांना चांगले अन्न खाणे, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि चांगली झोप घेणे यासारख्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला दिला.
''तरुणाईचा पाठलाग करण्याऐवजी...''मल्लिका शेरावतने व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ''बोटॉक्स आणि फिलरला नाही म्हणा. या कृत्रिम प्रक्रियांनी तरुण्याचा पाठलाग करण्याऐवजी मी आतून त्याचे पोषण करत आहे. निरोगी अन्न, हायड्रेशन, लवकर झोप आणि व्यायाम या काही सवयी मी नियमितपणे पाळते. चला आपल्या नॅचरल ग्लोचा स्वीकार करूया.''
शेफाली जरीवाला यांचे २७ जून रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूचे खरे कारण काय आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच उघड होईल. सध्या असे म्हटले जात आहे की अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला होता.