राब्तानंतर सुशांत सिंग आणि क्रिती सॅनन करणार पुन्हा रोमान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 15:01 IST
सुशांत सिंग आणि क्रिती सॅनन यांचा राब्ता चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरीही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडली ...
राब्तानंतर सुशांत सिंग आणि क्रिती सॅनन करणार पुन्हा रोमान्स!
सुशांत सिंग आणि क्रिती सॅनन यांचा राब्ता चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरीही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडली आहे. त्यांच्या फॅन्ससाठी आणखीन एक खूशखबर आहे. ते पुन्हा एकदा रोमांस करताना दिसणार आहेत. सुशांत आणि क्रिती लवकरच एक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहे. हा एक रोमांटिक व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओला कोरियोग्राफर अहमद खान याने डायरेक्ट केले आहे. एक वृत्तपत्राच्या माहितीनुसार 'पास आओ' असे या व्हिडिओचे नाव असणार आहे. तीन दिवस या व्हिडिओचे शूटिंग मुंबईत करण्यात आले. हे एक फन साँग आहे जे एक महोत्सवाच्या थीममध्ये शूट करण्यात आले आहे. सिटी स्टुडिओमध्ये यासाठी मोठा सेट लावण्यात आला होता आणि महोत्सवाची वातावरण निर्मिती करण्यासाठी खूप डान्सर्सना याठिकाणी बोलवण्यात आले होते. या गाण्याला 90 च्या दशकाचे फील देण्यात आले आहे. या व्हिडिओची निर्मिती भूषण कुमारची कंपनी टी-सीरीज करणार आहे. राब्ताच्या शूटिंग दरम्यान सुशांत आणि क्रिती यांच्यात अफेअर असल्याची चर्चा होती. दोघांनी याबाबत नेहमीच बोलण्यास नकार दिला.सुशांत आणि क्रितीने आपले नाते कधीच अधिकृत्यरित्या स्वीकारले नाही. 'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या अभिनयाचे कौतुकही सगळ्यांनी केले. यानंतर त्याच्याकडे चित्रपटाच्या रिघ लागली आहे. सध्या तो जॅकलिन फर्नांडिससोबत ड्राइव्ह याचित्रपटाचे चित्रिकरण करतो आहे. दिनेश विजान यांनी राब्ता चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते.