Join us  

सलमान खानचा 'भारत'सोडून प्रियांका चोप्राने सुरु केली फरहान अख्तरच्या सिनेमाची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 10:45 AM

प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

हा सिनेमा एक बायोपिक आहे. सिनेमाची कथा आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. प्रियांका आणि फरहान आई-वडीलांची भूमिका साकारणार आहे. याची मुलीची भूमिका दंगल फेम जायरा वसीम दिसणार आहे. जायरा आयशाच्या भूमिकेत आहे. नुकतेच मेकर्सनी याची अधिकृत घोषणा केली होती. आता या सिनेमाची शूटिंग सुरू देखील आहे. सिनेमाचे नाव अजून कळलेले नाही मात्र मेकर्सनी 'स्काई इज पिंक' असे प्राथमिक स्तरावर ठेवले आहे. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये या सिनेमाची शूटिंग होणार आहे.  सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला मिळून याची निर्मिती करतायेत.  सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहे तर जुही चतुर्वेदीने संवाद लिहिले आहेत. 

प्रियांका चोप्राने सलमानचा 'भारत' सिनेमा सोडल्यापासून अनेक चर्चा होतायेत. प्रियांका शेवटी 2016मध्ये आलेल्या प्रकाश झा यांच्या जय गंगाजलमध्ये दिसली होती. त्यानंतर ती हॉलिवूडच्या प्रोजेक्टसमध्ये बिझी झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांकाने  निकसोबत साखरपुडा केल्याची चर्चा आहे.   दिल्लीच्या इव्हेंटमध्ये प्रियांकाला हाच प्रश्न विचारला गेला. पण या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी, ‘मुझे हक है’ सांगत प्रियांकाने वेगळाच सूर लावला. माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी लोकांना ठाऊक आहेत. ९० टक्के गोष्टी लोकांना माहित आहेत. उरलेल्या १० टक्के गोष्टींवर मात्र केवळ माझा आणि माझा हक्क आहे. मी एक मुलगी आहे आणि काही गोष्टी स्वत:पर्यंतचं ठेवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीवर खुलासा देणे मी गरजेचा मानत नाही. 

टॅग्स :प्रियंका चोप्राफरहान अख्तर