Join us  

बॉलिवूडची 'क्वीन' तर आलीच, आता 'या' स्टारकिडची राजकारणात यायची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:54 PM

आता स्टारकीड्सचा जमाना आहे. त्यामुळे एखाद्या स्टारकीडने निवडणूक लढवली तर आश्चर्य वाटायला नको.

लोकसभा निवडणूकांचं बिगुल वाजलं आहे. सेलिब्रिटींनी निवडणूकीच्या रिंगणात उतरणं यात काही नवीन नाही. यंदा बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत  हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवणार आहे. तर मेरठ मधून अरुण गोविल उभे राहिले आहेत. भाजपाने यांना तिकीट दिलं आहे. याशिवाय इतरही काहींची नावं चर्चेत आहेत. दरम्यान एका स्टारकीडचीही राजकारणात एन्ट्रीची चर्चा रंगली आहे.

आतापर्यंत कलाकारांनी निवडणूक लढवल्याचं आपण बघितलंच आहे. पण आता स्टारकीड्सचा जमाना आहे. त्यामुळे एखाद्या स्टारकीडने निवडणूक लढवली तर आश्चर्य वाटायला नको. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानने (Sara Ali Khan) राजकारणातील एन्ट्रीवर भाष्य केलं आहे. भविष्यातील प्लॅनिंगविषयी ती म्हणाली, "नक्कीच मी भविष्यात राजकारणात येण्याचा विचार करु शकते. मी इतिहास आणि राज्यशास्त्रात डिग्री घेतली आहे. मी आयुष्यात पुढे गेल्यानंतर नक्कीच राजकारणात येऊ शकते. हा काही बॅकअप प्लॅन नाही. जोपर्यंत मला प्रेक्षक बॉलिवूडमध्ये राहण्याची संधी देत राहतील तोवर मी इथून अजिबात जाणार नाही."

साराची राजकारणात येण्याची इच्छा समजल्यावर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 'कोणतंच क्षेत्र सोडू नका' असा टोमणाही तिला मारला आहे. अर्थात साराचा हा प्लॅन भविष्याबाबतीत असणार आहे. सध्या ती केवळ सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साराचा 'ऐ वतन मेरे वतन' सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. हा एक पॉलिटिकल ड्रामा होता. यामध्ये तिने स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची भूमिका साकारली. सिनेमातील साराच्या अभिनयावर प्रेक्षक तिची स्तुती करत आहेत. याशिवाय साराचा 'मर्डर मुबारक' हा सिनेमाही ओटीटीवर रिलीज झाला आहे. आता ती अनुराग बसूच्या 'मेट्रो इन दिनो' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर झळकणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.

टॅग्स :सारा अली खानराजकारणनिवडणूककंगना राणौत