Join us  

हिमेशनंतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह दिसणार होती राणू मंडल, या कारणामुळे समोर आलेली संधीही हुकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 10:44 AM

राणूला चाहत्यांसह केलेल्या गैरवर्तवणूकीसाठी माफी मागण्याचेही सांगण्यात आले होते मात्र राणूने असे केले नाही. हळूहळू तिची लोकप्रियता कमी होत गेली. सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नसल्याचेही माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या राणू मंडल यांना हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर राणू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार राणू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. ''एक प्यार का नगमा हे'' गाणं गात राणू स्टार बनल्या, कधी काळी रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणारी राणू मंडलची पुन्हा पूर्वीसारखीच अवस्था झाली आहे. 

हिमेश रेशमियाने दिलेल्या संधीमुळे तिची तुफान चर्चाही झाली. मात्र बघता बघात राणूमध्ये अहंकार निर्माण झाला. त्यामुळे इतरांशी देखील ती उद्धटपणे वागायची. एका ठिकाणी चाहत्यांनी राणूला पाहिले, तिला भेटण्यासाठी ते तिच्याजवळ गेले तेव्हा राणूने त्यांच्यासह गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून राणूबद्दल लोकांमध्येही द्वेष निर्माण झाला.

स्टारडम सांभाळणं,  समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. जितक्या वेगाने राणू मंडल लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली तितक्याच झटकन तिचे स्टारडमही संपले. स्वतःला मिळालेलं स्टारडममुळे सेलिब्रेटी स्टेटस प्राप्त झालेल्या राणू मंडलला एका शोसाठीही आमंत्रण करण्यात येणार होते.  विशेष म्हणजे या शोमध्ये आमिताभ बच्चन सहभागी होणार होते. अमिताभ बच्चन यांच्यासह राणू मंडलला या शोचे भाग होता येणार होते. मात्र त्या व्हिडीओमुळे राणू मंडलला शोमध्ये सहभागी करून घ्यायचा निर्णयही रद्द करण्यात आला होता.

राणूला चाहत्यांसह केलेल्या गैरवर्तवणूकीसाठी माफी मागण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र राणूने असे केले नाही. हळूहळू तिची लोकप्रियता कमी होत गेली. सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नसल्याचीही माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये गरजुंना धान्य वाटपाची मदत करताना राणूचे फोटो समोर आले होते. मात्र जसा लॉकडाऊन वाढत गेला आणि त्याचबरोबर राणूचीही परिस्थिती बिकट होत गेली. आता ती कोणालाही मदत करताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा पूर्वीसारखेच जीवन जगणं तिच्या वाट्याला आल्याचे समजतंय.

राणू मंडलला सध्या दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. अनेकवेळा रात्री उपाशीच झोपण्याची तिच्यावर वेळ येत आहे. एका वेळाचे जेवण मिळाले तरीही केवळ भात खावून तिला राहावे लागत आहे आणि त्यातही कमाईचे काहीही साधन नसल्याने एकावेळेच्या जेवणासाठी देखील तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजूबाजूच्या लोकांनी काही खायला दिले, तरच तिच्या जेवणाची सोय होत आहे.

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया