दीपिका पादुकोणची एंट्री होताच कॅटरिना कैप अर्धवट सोडून गेली शाहरुख खानची बर्थ-डे पार्टी.. जाणून घ्या या मागचे कारण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 10:59 IST
शाहरुख खान आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करतो आहे. शाहरुख आपला वाढदिवस अलिबागमधल्या फार्म हाऊसवर जाऊन साजरा करतो ...
दीपिका पादुकोणची एंट्री होताच कॅटरिना कैप अर्धवट सोडून गेली शाहरुख खानची बर्थ-डे पार्टी.. जाणून घ्या या मागचे कारण ?
शाहरुख खान आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करतो आहे. शाहरुख आपला वाढदिवस अलिबागमधल्या फार्म हाऊसवर जाऊन साजरा करतो आहे. यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबियांसह त्याचा मित्रपरिवार कालच अलिबागला रवाना झाला आहे. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कऱण जोहर, फराह खान, श्वेता बच्चन, कॅटरिना कैप आणि दीपिका पादुकोण हे कालाकार कालच शाहरुखच्या फार्म हाऊसवर पोहोचले आहेत. मात्र कहानीमध्ये इकडे एक छोटासा ट्विस्ट आला. शाहरुख खानची बर्थ डे पार्टी सुरु होण्याआधीच कॅटरिना कैफने तिथून काढता पाय घेतला. जशी दीपिका पादुकोणची फार्म हाऊसवर एंट्री झाली तसे कॅटरिना तिकडून निघाली. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की दीपिका आणि कॅटरिनामध्ये अजूनही कॉल्ड वॉर सुरु आहे. कॅटरिनाला या पार्टीत कोणताट वाद नको होता म्हणून तिने तिथून निघून जाणेच योग्य समजले. कॅटरिना आणि दीपिकामधले नातं अजून सर्वसामान्य झाले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोघांमध्ये वादाची ठिणगी पडण्याचे कारण म्हणजे अर्थात रणबीर कपूर. दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशीपमध्ये असताना रणबीरने कॅटरिनाला डेट करत होता. याकारणामुळे दीपिका आणि कॅटरिनामधले संबंध बिघडले. मात्र कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे अफेअरही खूप दिवस चालले नाही. कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण दोघीही आज बॉलिवूडमधल्या टॉपच्या अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोणचा पद्मावती चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामधील दीपिकाच्या लूकला घेऊन सध्या ती खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तिने तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. तर कॅटरिना कैफचा सलमान खानसोबत टायगर जिंदा है चित्रपटा ख्रिसमला रिलीज होणार आहे. हा एक था टायगरचा सीक्वल आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कॅटरिना आणि सलमान एकत्र स्क्रिन शेअर करतायेत.