Join us

'डॉन' आणि 'अग्निपथ'नंतर अमिताभ बच्चन यांच्या आणखी एका सिनेमाचा येणार हिंदी रिमेक

By अमित इंगोले | Updated: October 22, 2020 15:28 IST

अमिताभ बच्चन यांच्या 'सत्ते पे सत्ता' सिनेमाच्या रिमेकचीही चर्चा रंगली होती. पण हा सिनेमा बंद पडलाय. अशात आता त्यांच्या आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक तयार होणार आहे. 

बॉलिवू़डचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांचे रिमेक वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार झाले. त्यांच्या 'डॉन' आणि 'अग्निपथ'च्या हिंदी रिमेकलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.  त्यांच्या 'सत्ते पे सत्ता' सिनेमाच्या रिमेकचीही चर्चा रंगली होती. पण हा सिनेमा बंद पडलाय. अशात आता त्यांच्या आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक तयार होणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट 'नमल हलाल' सिनेमाचा हिंदी रिमेक केला जाणार आहे. १९८२ मध्ये रिलीज झालेल्या या धमाकेदार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता पाटील, परवीन बाबी, शशी कपूर आणि ओमप्रकाश यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. हा सिनेमा तर सुपरहिट होताच सोबतच या सिनेमातील सर्व गाणीही हिट ठरली होती. आजही ही गाणी ऐकली जातात. आता 'नमक हलाल'चे राइट्स 'कबीर सिंग'सारख्या सुपरहिट सिनेमाचे निर्माते मुराद खेतानी यांनी खरेदी केले आहेत. 

मुराद यांनी बातमीला दुजोरा देत एका न्यूज पोर्टलला सांगितले की, हा सिनेमा प्रत्येक वयाच्या प्रेक्षकांना आवडला होता. सध्या आम्ही या सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करत आहोत. तसेच मुराद यांनी सांगितले की, अजूनपर्यंत या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार आणि कलाकार कोण असतील हे फायनल झालेलं नाही. त्यामुळे आता बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, अमिताभ, शशी कपूर, स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांच्या भूमिका रिमेकमध्ये कोण साकारणार. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड