Join us  

दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे ही बँड बाजा बाजारात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:54 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत आहे. दोघांच्या कुटुंबीयांदेखील त्यांच्या नात्याला मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्दे रणबीर नाही तर संपूर्ण कपूर कुटुंबीयांना आलिया पसंत आहेसोशल मीडियापासून तर त्याचे नाते कधीच लपून राहिलेले नाही

सध्या बॉलिवूडमध्ये लगीनसराई सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या रिलेशनशीपला एक पाऊल पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे त्यामुळे हे कपल पुढच्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत आहे. दोघांच्या कुटुंबीयांदेखील त्यांच्या नात्याला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांच्या बरी होण्याची वाट दोन्ही कुटुंबीय करतायेत. सध्या ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतायेत.   

रिपोर्टनुसार फक्त रणबीर नाही तर संपूर्ण कपूर कुटुंबीयांना आलिया पसंत आहे. तसे पाहिला गेले तर कपूर कुटुंबीयांमध्ये लग्नानंतर मुलींना काम करायला परवानगी नाही मात्र आलिया याला अपवाद आहे. लग्नानंतरदेखील ती काम करणार आहे. अनेकदा रणबीर कपूर आणि आलिया भट्टला एकत्र पाहिले आहे. सोशल मीडियापासून तर त्याचे नाते कधीच लपून राहिलेले नाही. दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे आलियाच्या फोटोंवर नीतू कपूर नेहमीच पसंती आणि दाद देताना दिसतात. आलियाचा आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. अयान मुखर्जीचा आगामी सिनेमा ब्रम्हास्त्र सिनेमात रणबीर आणि आलिया एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. या सिनेमात या दोघांसोबतच अमिताभ बच्चनसुद्धा झळकणार आहेत. रणबीर आणि आलियाने आपलं नातं अद्याप स्वीकारलेले नाही.  

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर