Join us  

नेहा कक्कडचे ‘मुव्ह ऑन’! शेअर केला फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:40 AM

बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड हिचे अलीकडे ब्रेकअप झाले. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाला सावरणे कठीण जातेय. पण हळूहळू यातून बाहेर येण्याचे प्रयत्न नेहाने चालवले आहेत.

ठळक मुद्देब्रेकअपचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत, नेहाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती हसताना दिसलेय.

बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड हिचे अलीकडे ब्रेकअप झाले. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाला सावरणे कठीण जातेय. पण हळूहळू यातून बाहेर येण्याचे प्रयत्न नेहाने चालवले आहेत. गतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याची तिची धडपड स्पष्ट दिसतेय.ब्रेकअपचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत, नेहाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती हसताना दिसलेय. यासोबत लिहिलेला मॅसेज बरेच काही सांगणारे आहे. ‘पुरेसा सन्मान आणि पे्रम मिळाल्यास महिलांच्या चेह-यावर आणखीच तेज येते...’ असे नेहाने लिहिले आहे.

नेहाचा हा मॅसेज एक्स बॉयफ्रेन्ड हिमांशकडे इशारा करणारा आहे. नेहाने आपला एक जुना फोटोही पिन केला आहे. यात ती खळखळून हसताना दिसतेय. या फोटोला तिने दिलेले कॅप्शनही खास आहे.

कुणाच्या चेह-यावर हसू नसेल तर त्याला आपल्या चेह-यावरचे हास्य द्या, असे नेहाने लिहिले आहे.ताज्या मुलाखतीत नेहाने हिमांशबद्दल बोलायला नकार दिला होता. अगदी कोण हिमांश? मी त्याला ओळखत नाही. अशा नावाची कुठलीच व्यक्ती माझ्या परिचयाची नाही,असे ती म्हणाली होती.नेहा व हिमांश गत ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.  नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते. ‘इंडियन आयडॉल 10’मध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चयार्चा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती.

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली