Join us  

‘ इंडियल आयडॉल 10’च्या या स्पर्धकासोबत जोडले जातेय नेहा कक्करचे नाव, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:12 PM

बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर काही महिन्यांपूर्वी तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देइंडियन आयडॉल 10 नंतर नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते.

बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर काही महिन्यांपूर्वी तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. होय, इंडियल आयडॉल 10 च्या एका स्पर्धकासोबत तिचे नाव जोडले जात आहे. हा स्पर्धक कोण तर विभोर पाराशर.नेहाने इंडियन आयडॉल 10  हा रिअ‍ॅलिटी शो जज केला होता. याच शोमधील एक स्पर्धक विभोर पाराशर आणि नेहाच्या डेटींगच्या बातम्या सध्या जोरात आहेत.

अलीकडे नेहाने विभोरसोबत अनेक इव्हेंट केलेत. यादरम्यानचे दोघांचे फोटो, या फोटोतील दोघांची केमिस्ट्री बघता, त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. अर्थात या चर्चा ऐकून विभोर नाराज आहे. बॉलिवूड लाईफशी बोलताना त्याने ही नाराजी बोलून दाखवली. या सगळ्या चर्चा तुम्ही अफवा समजू शकतात. कुणी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मदत करत असेल तर ते केवळ तुमच्यातील टॅलेंटमुळे. मी इन्स्टाग्रामवर नेहाला ‘दीदी’ म्हणून टॅग करत नाही, यावरून ती माझी गर्लफ्रेन्ड आहे, असा अर्थ लोकांनी लावला. आज मी जे काही आहे, केवळ तिच्यामुळे आहे. मी तिचा प्रचंड आदर करतो. अशा अफवांवर मी रिअ‍ॅक्ट होऊ नये, असे मला वाटते. अशा बातम्या ऐकल्या की माझी सटकते, असे तो म्हणाला. अद्याप नेहाने या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ती यावर काय खुलासा करते, ते बघूच.

इंडियन आयडॉल 10 नंतर नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते. या ब्रेकअपनंतर नेहा सैरभैर झाली होती. साहजिकच  या दु:खातून सावरायला तिला बराच वेळ लागला. पण आता ती यातून पूर्णपणे बाहेर पडली आहे.

अलीकडे एका मुलाखतीत, हिमांशसोबत ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासाही तिने केला होता.  जो माझ्या योग्यतेचाच नव्हता, त्याच्यावर मी माझा अमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली, असे सांगत हिमांशसोबतचे ब्रेकअप ही माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट असल्याचेही ती म्हणाली होती.  

टॅग्स :नेहा कक्कर