Join us  

Aryan Khan Arrest News : आर्यनला सोडवण्यासाठी सलमानचं पूर्ण 'खान'दान मदतीला; अलवीरा देखील करतीये मदत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 12:29 PM

Aryan Khan Arrest News : आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सलमानने ताबडतोब शाहरुखच्या घरी धाव घेतली होती. त्यानंतर आता सलमानची बहीण अलवीरादेखील गौरीच्या मदतीसाठी पुढे आल्याचं म्हटलं जात आहे. 

ठळक मुद्देरविवारी संध्याकाळी आर्यनला अटक झाल्यानंतर सोमवारी सलमानची बहीण अलवीरा खान मन्नतवर पोहोचली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने (NCB) शनिवारी मुंबईतील (mumbai) एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. यावेळी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानसह अन्य ८ जणांना ताब्यात घेतलं. या ड्रग्स पार्टीमध्ये आर्यन खान(Aryan Khan) सहभागी असल्यामुळे कलाविश्वात एकच गदारोळ माजला आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या मन्नतवर धाव घेत असून शाहरुख आणि गौरीला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी शाहरुखला मदत देखील करत आहेत. यामध्येच सलमान खान जुने वाद विसरुन शाहरुखच्या मदतीला आल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर सलमानच्या संपूर्ण कुटुंबाने सध्या शाहरुखला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सलमानने ताबडतोब शाहरुखच्या घरी धाव घेतली होती. त्यानंतर आता सलमानची बहीण अलवीरादेखील गौरीच्या मदतीसाठी पुढे आल्याचं म्हटलं जात आहे. क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी मुंबईच्या फोर्ट कोर्टाने आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या हा काळ आर्यनसह शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबासाठी कठीण असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच सलमानची बहीण आणि वहिनी गौरीला पाठिंबा देण्यासाठी मन्नतवर पोहोचले आहेत. 

Mumbai Cruise Drugs Case : आर्यनसह ताब्यात घेण्यात आलेली मुनमुन धमेचा नेमकी आहे तरी कोण?

सलमानच्या कुटुंबातील 'या' सदस्यांनी घेतली गौरी-शाहरुखची भेट

रविवारी संध्याकाळी आर्यनला अटक झाल्यानंतर सोमवारी सलमानची बहीण अलवीरा खान मन्नतवर पोहोचली. तिच्या पाठोपाठ सलमानची वहिनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानदेखील गौरची भेट घ्यायला गेली. सोबतच संजय कपूरची पत्नी महेपदेखील मन्नतवर पोहोचल्याचं सांगण्यात येतं. सीमा आणि महेप या दोघी गौरी खानच्या जवळच्या मैत्रिणी असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोआर्यन खानशाहरुख खानसलमान खान