Join us  

'अ‍ॅनिमल' हिट झाल्यानंतर रश्मिका मंदाना पोहचली काश्मीरमध्ये, पोजमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 5:39 PM

Animal Movie : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ४०० कोटींची कमाई केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर(Anil Kapoor), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ४०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशानंतर अनेक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना पार्टीतून गायब होते. दरम्यान, आता रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना खूप मस्ती करताना दिसली. रश्मिका मंदान्नाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांनी खूप शेअर केला आहे.

दाक्षिणात्य ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. रश्मिका मंदान्नाचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट हिट झाल्यानंतर या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना खूप मस्ती करताना दिसते आहे. 

रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना खूपच क्यूट दिसत आहे. रश्मिका मंदान्नाच्या या क्यूट लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रश्मिका मंदान्नाचा हा व्हायरल व्हिडिओ काश्मीरमधील आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एका सुंदर कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

रश्मिका मंदाना झाली ट्रोल रश्मिका मंदाना तिच्या या नवीन व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. रश्मिकाची बसण्याची स्टाईल लोकांना अजिबात आवडलेली नाही. यावर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

टॅग्स :रश्मिका मंदानारणबीर कपूर