Join us  

१७ वर्षात चार वेळा निकाह; गुंतागुंतीची आहे अदनान सामीची मॅरीड लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:12 PM

Adnan sami: एकाच पत्नीशी केलं दोन वेळा लग्न

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांच्या यादीत अदनान सामी (adnan sami) याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. 'तेरा चेहरा' ,'कभी नज़र मिलाओ', 'ढोलकी' अशी कितीतरी त्यांची गाणी लोकप्रिय झाली आहेत. अदनान सामी मध्यंतरी त्याच्या वेट लॉस जर्नीमुळे चर्चेत आला होता. मात्र, सध्या तो त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. रोया खानसोबत चौथ लग्न करणाऱ्या अदनानचं मॅरीड लाईफ प्रचंड गुंतागुंतीचं असल्याचं पाहायला मिळतं. यात एकाच पत्नीसोबत त्याने दोन वेळा निकाह केला आहे.

उत्तम आवाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या अदनान सामीने १७ वर्षांत तब्बल ४ वेळा निकाह केला आहे. त्यामुळे त्याचं वैवाहिक आयुष्य बऱ्याचदा चर्चेत आलं.

अल्पावधीत मोडला पहिला संसार

अदनानने १९९३ मध्ये जेबा बख्तियारसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यांना अजान खान हा एक मुलगादेखील आहे. परंतु, लग्नानंतर केवळ ३ वर्षांमध्येच अदनान-जेबाचा संसार मोडला.  त्यानंतर २००१ मध्ये अदनानने दुबईमध्ये सबा गलदारीसोबत दुसरं लग्न केलं.

दुसरं लग्नही ठरलं अयशस्वी

२००१ मध्ये सबा गलदारीसोबत लग्न करणाऱ्या अदनानने लग्नाच्या दीड वर्षांमध्येच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा झालेल्या घटस्फोटानंतर अदनान पुन्हा एकाकी पडला. याच काळात पुन्हा एकदा त्याची आणि त्याची पहिली पत्नी सबा यांची जवळीकता वाढली. त्यामुळे २००८ मध्ये अदनान आणि सबा यांनी पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केलं. परंतु, पुन्हा एकदा हा संसार मोडला. लग्नाला १ वर्ष झाल्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा विभक्त झाली.

चौथ लग्न ठरलं यशस्वी

२०१० मध्ये अदनानने रोया खान हिच्यासोबत चौथ लग्न केलं. रोया एका रिडायर्ड डिप्लोमॅट आणि आर्मी जनरल यांची लेक आहे. रोया आणि अदनान यांनी २०१० मध्ये लग्न केलं आता त्यांना मदिना ही एक लेकदेखील आहे. 

टॅग्स :अदनान सामीसेलिब्रिटीबॉलिवूड