Join us  

Adnan Sami : अदनान सामीकडे 230 किलो झालेले वजन कमी करण्याशिवाय राहिला नव्हता पर्याय, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:48 AM

Adnan Sami : अदनान सामीचे वजन 230 किलो झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे अदनान सामीला आरोग्याशी संबंधित अनेक अडचणी आल्या होत्या.

Adnan Sami Facts: गायक अदनान सामी(Adnan Sami)  आज 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करतो आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला अदनान सामीविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत .मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदनान सामी 35 पेक्षा जास्त वाद्य वाजवतो. त्याचबरोबर पियानो वाजवण्यातही त्याला विशेष प्राविण्य आहे. अदनान सामी पाकिस्तानमध्ये बराच काळ वास्तव्यास होता पण तो आता भारतीय नागरिक आहे. अदनान सामी केवळ त्याच्या पर्सनल नाही तर प्रोफेशनल लाईफमुळेही चर्चेत असतो.

अदनान सामीने एक-दोन नव्हे तर 4 लग्न केल्याचे बोलले जाते, मात्र त्याची शेवटची 3 लग्न पाच वर्षेही टिकू शकली नाहीत. अदनान सामी त्याच्या वाढलेल्या वजानामुळे ही चर्चेत होता. 

अदनान सामीचे वजन एकेकाळी 230 किलो झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे अदनान सामीला आरोग्याशी संबंधित अनेक अडचणी आल्या होत्या. परिस्थिती तर इथंपर्यंत आली होती की, डॉक्टरांनीही त्याला सांगितले होते की, जर त्याने आता वजन कमी केले नाही तर तो सहा महिन्यांपेक्षा जास्त जगू शकणार नाही. मात्र, त्यानंतर अदनानने ज्यापद्धतीने वजन कमी करण्याचे मनावर घेतले आणि ते केलं त्याचं आजही उदाहरण दिलं जातं.  

 खरं तर, 15 महिन्यांत, गायकाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता 165 किलो वजन कमी केले होते. एकदा एका मुलाखतीत अदनानने सांगितले होते की, वजन कमी करण्यासाठी त्याने आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली होती आणि जेवणात प्रोटीनला जास्त महत्त्व दिले होते.

टॅग्स :अदनान सामीबॉलिवूडसेलिब्रिटी