Join us

आदित्य-मल्लिकाचा शाही विवाह सोहळाअभिेनेते दीपक पारेख यांचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 06:36 IST

आदित्य-मल्लिकाचा शाही विवाह सोहळाअभिेनेते दीपक पारेख यांचा मुलगा आदित्य याच्या विवाहाला चार पाच आठवडे झाले, मात्र या सोहळ्याच्या ...

आदित्य-मल्लिकाचा शाही विवाह सोहळाअभिेनेते दीपक पारेख यांचा मुलगा आदित्य याच्या विवाहाला चार पाच आठवडे झाले, मात्र या सोहळ्याच्या आठवणी अनेकांच्या मनात रेंगाळत आहेत. अमेरिकेत जन्मलेल्या पण मूळची भारतीय असलेल्या मल्लिका तारकस हिच्याशी 6 सप्टेंबरला आदित्यचा विवाह झाला. तीन दिवस चाललेला स्वप्नवत वाटावा असा हा सोहळा ग्रीसमधल्या मायकोनोस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या निमित्त पाहुण्यांसाठी झालेल्या काराओके गायन स्पर्धेत आदित्यनेही सहभागी होऊन पाहुण्यांना सरप्राइज दिले. आदित्य आणि मल्लिका या दोघांच्याही कुटुंबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मल्लिका ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या दोघांच्या सोहळ्याला मोजक्या केवळ 175 व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. चंद्रू रहेजा (के. रहेजा कार्पो.),हेमेंद्र कोठारी (डीएसपी ब्लॅकरॉक), अजय पिरामल (पिरामल ग्रुप), संजय नय्यर (सीईओ, केकेआर इंडिया), नरेश गोयल (जेड एयरवेज) आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा या पाहुण्यांमध्ये समावेश होता. दिल्ली येथील विवाह सोहळा नियोजक वंदना मोहन यांच्याकडे आयोजनाची संपूर्ण जबाबदारी दिली होती. ती त्यांनी योग्यप्रकारे पार पाडली.