रणवीर सिंगसोबत 'या' कारणामुळे पुढचा चित्रपट करणार नाही आदित्य चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 11:03 IST
रणवीर सिंगने आपल्या करिअरची सुरुवात यशराज बॅनरच्या 'बँड बाजा बारात' चित्रपटातून केली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला आणि ...
रणवीर सिंगसोबत 'या' कारणामुळे पुढचा चित्रपट करणार नाही आदित्य चोप्रा
रणवीर सिंगने आपल्या करिअरची सुरुवात यशराज बॅनरच्या 'बँड बाजा बारात' चित्रपटातून केली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला आणि त्यानंतर मग रणवीरचे आदित्य चोप्राच्या फॅव्हरेट लिस्टमध्ये सामील झाले. 2016मध्ये जेव्हा आदित्याने रब ने बना जोडीनंतर दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना त्या चित्रपटात रणवीर सिंगला साईन केले. मात्र बेफिक्रे चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर निराशा केली. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही आदित्यचा रणवीर सिंगवरचा विश्वास कायम होता. गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की आदित्य चोप्रा रणवीर सिंगला घेऊन एक नवा चित्रपट तयार करण्याचा विचार करतो आहे. हा चित्रपट बेफ्रिकेप्रमाणे बोल्ड नसून कुटुंबिक असणार आहे. यशराज फिल्मकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. यशराजने फिल्मकडून सांगण्यात आले की, गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरु आहे की आदित्य आणि रणवीर एकत्र काम करणार आहेत ही गोष्ट केवळ अफवा आहे. अजूनपर्यंत आदित्याने कोणताच आगामी चित्रपट साईन केलेला नाही. पुढचा एक वर्ष तो यशराज बॅनरच्या अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे त्यामुळे त्याला स्क्रिप्टवर काम करणे कठिण आहे. ALSO READ : रणवीर सिंगला कुठून मिळते इतकी ‘हाय एनर्जी’?जर रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांच्या शेड्यूलबाबत बोलायचे झाले तर त्याचे ही शेड्यूल पुढचे एक वर्ष व्यस्त आहे. सध्या तो जोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘गली बॉय’ मध्ये रणवीरच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. या चित्रपटात आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. यानंतर तो रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'च्या तयारीला लागणार आहे. सिम्बानंतर रणवीर कबीर खानच्या १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप टीमवर आधारित चित्रपटामध्ये व्यस्त होणार आहे एकूण काय तर आदित्य चोप्रा प्रमाणे रणवीर सिंगचे शूड्यूलही बिझी आहे.