Join us

'अदिरा' ही सर्वोत्तम भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 05:42 IST

अदिरा ही मला व माझा पती आदित्य चोप्राला ईश्‍वराने दिलेली सर्वोत्तम  भेट आहे, अशा शब्दांत राणी मुखर्जीने कन्याजन्माचे स्वागत केले ...

अदिरा ही मला व माझा पती आदित्य चोप्राला ईश्‍वराने दिलेली सर्वोत्तम  भेट आहे, अशा शब्दांत राणी मुखर्जीने कन्याजन्माचे स्वागत केले आहे. बुधवारी सकाळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात तिला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नामकरण 'अदिरा' असे करण्यात आले आहे. आज ईश्‍वराने आयुष्यातील सर्वोत्तम भेट मला दिली आहे. माझ्या सर्व चाहत्यांच्या, सहकार्‍यांचे आशीर्वाद व सदिच्छा माझ्यासोबत होत्या. सर्वांचे आभार, असे तिने यशराज फिल्मच्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे.