Join us  

Adipurush Box Office Collections : संवाद बदलले, तिकिट दरही घटवले; 'आदिपुरुष'नं ८व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 9:17 AM

Adipurush Box Office Collections : 'आदिपुरुष'ची कमाई दिवसेंदिवस घटत आहे. शुक्रवारीही चित्रपटाने सर्वात कमी कलेक्शन केले.

प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)च्या 'आदिपुरुष'(Adipurush)ने थिएटरमध्ये एक आठवडा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतातील पौराणिक चित्रपटाची कमाई ओपनिंग वीकेंडपासून दररोज कमी होत असली तरी 'आदिपुरुष'ने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या ८व्या दिवशी किती बिझनेस केला आहे ते येथे जाणून घेऊया.

'आदिपुरुष' हा थ्रीडी चित्रपट आहे जो १६ जून रोजी अनेक भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, प्रचंड बजेटमध्ये बनलेला प्रभास स्टारर चित्रपट त्याच्या संवादांमुळे आणि  पात्रांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि त्यामुळे त्याच्या कमाईतही सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे आहे. खूप गाजलेला हा चित्रपट आता थंडावला असून प्रेक्षकांनी तो पूर्णपणे नाकारला आहे असे दिसते. या सगळ्यात आता चित्रपटाच्या ८व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत, जे खूपच धक्कादायक आहेत. SacNilk च्या ट्रेड रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' ने रिलीजच्या ८ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी फक्त ३.५० कोटी कमावले आहेत. 'आदिपुरुष'च्या कमाईचा हा आकडा आजपर्यंतचा सर्वात कमी कलेक्शन आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता २६३.४० कोटींवर गेली आहे.

या वीकेंडला 'आदिपुरुष'ने वेग वाढवला पाहिजे५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'आदिपुरुष'ची घटती कमाई निर्मात्यांची झोप उडवत आहे. चित्रपटाने निःसंशयपणे जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, परंतु भारतात त्याची कमाई मोठ्या प्रमाणात घटत आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा या वीकेंडकडे लागल्या आहेत. या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने गती मिळवणे फार महत्वाचे आहे.

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉन