Join us  

पुन्हा व्हायरल होतोय बॉलिवूड अभिनेत्रीचा मंकी डान्स, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 6:00 AM

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार के' आणि हंसी तो फंसी या सिनेमतही तिने भूमिका साकारल्या. मात्र या सिनेमांना फारसं यश मिळालं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर या ना त्या पद्धतीने अदा तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. कधी आपल्या आजीसह ती डान्स करते तर कधी एखादं चॅलेंज पूर्ण करताना ती पाहायला मिळते. मात्र मध्यंतरी अदाने असं काही केलं की जे पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल. तिने एका माकडाचा मुखवटा लावून मंकी डान्स केला  होता आणि तिच्या सोशल मीडियावरील डान्सच्या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक नेटिझन्सनी  होता. अदाचा हा फंडाही रसिकांना भावला असून लंडनमध्ये हा व्हिडीओ. चित्रीत करण्यात आला होता.  

या व्हिडीओसोबत अदाने एक पोस्टसुद्धा शेअर केली होती. बोटाची जखम आता बरी होत असून तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी सगळ्यांचे आभार. लंडनमध्ये कुणीतरी आपल्याला माकडाचा हा मुखवटा भेट दिल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले होते.  आपलं दुखणं काही वेळासाठी विसरता यावं यासाठी हा मुखवटा घालून अदाने डान्स केला आणि हसत हसत या डान्सचा धम्माल आनंद लुटला. या डान्स मस्तीचा फायदा झाल्याचंही तिने नमूद केलं.

शूटिंगच्या दरम्यान लंच ब्रेकच्या काळात हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता.  दिग्दर्शक अभिनेता प्रभूदेवा यांच्या अनेक गाण्यातील आवडत्या गाण्यांपैकी एक हे गाणं आहे असंही अदाने म्हटले होते. या व्हिडीओतील लूक हा आगामी चार्ली चॅप्लिन-२ किंवा कमांडो-३ या सिनेमातील नाही हेसुद्धा अदाने स्पष्ट केले आहे.

 

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार के' आणि हंसी तो फंसी या सिनेमतही तिने भूमिका साकारल्या. मात्र या सिनेमांना फारसं यश मिळालं नाही. यानंतर विद्युत जामवालस अदा कमांडो-२ या सिनेमात झळकली. या सिनेमातली तिची भूमिका रसिकांना भावली. सध्या ती कमांडो-३ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. 

लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ

घराची गच्चीची साफ सफाई करताना ती दिसते. यात तिचा देसी अंदाज पाहायला मिळतोय. चक्क साडी तिने परिधान केली आहे. गच्ची साफ करता -करता अदा अचानक स्टंट करू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच अनेकजण कौतुक करत लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :अदा शर्मा