Join us  

 अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी आई-वडिल आले होते पॉझिटीव्ह

By रूपाली मुधोळकर | Published: October 04, 2020 3:38 PM

काही दिवसांपूर्वी तमन्नाच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तमन्नाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. आता मात्र तमन्नाही कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे.

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वीच ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशभर कोरोनाचा कहर सुरु असताना आता साऊथची दिग्गज अभिनेत्री तमन्ना भाटियालाही  कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे कळतेय.  काही दिवसांपूर्वी तमन्नाच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तमन्नाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. आता मात्र तमन्नाही कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. नमस्ते तेलंंगणाने याबाबत वृत्त दिले आहे.

ऑगस्ट महिन्यांत तमन्नाने एक पोस्ट शेअर करत तिच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. माझ्या आईवडिलांमध्ये कोव्हिड 19 ची काही लक्षणे दिसली होती. यानंतर आम्ही लगेच टेस्ट केल्यात. दुदैवाने माझ्या आईवडिलांची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. आमच्या कुटुंबातील अन्य सदस्य निगेटीव्ह आहेत, असे तिने सांगितले होते.

बॉलिवूडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिच्या सौंदयार्मुळे रसिकांनी तिला मिल्क हे नाव दिले आहे. दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने ‘श्री’ सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

तमन्ना भाटियाच्या आई- वडिलांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

अभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics

तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी!गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.   काही दिवसांपूर्वीच अग्गंबाई सासूबाई या मराठी मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाला आहे. सध्या त्या होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याआधी ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बच्चन कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र चौघांनीही कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. अनेक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जण यातून बरे झाले आहेत.

टॅग्स :तमन्ना भाटिया