Join us  

अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड पाहिलात का? एकत्र सेलिब्रेट केलं न्यू इअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 3:33 PM

तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. ओटीटी विश्वातदेखील तिने आपला दबदबा कायम ठेवला आहे. किंग खान शाहरुखसोबत ती 'डंकी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. यातच तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

अभिनेत्रीने तिच्या नवीन वर्ष 2023 च्या सेलिब्रेशनची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली.  ज्यामध्ये चाहत्यांना तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोये पाहायला मिळाला. तिच्या बॉयफ्रेंडची झलक पाहून चाहते खूश झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का मॅथियास काय करतो आणि ते कोण आहे. तर मॅथियास बोये हा एक बॅडमिंटनपटू आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

एका मॅचदरम्यान दोघांची भेट झाली होती. गेल्या काही वर्षांपासून मॅथियास बोईसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे अनेकदा एकत्र फोटो समोर आले आहेत. दोघेही अनेकदा एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, कामामुळे दोघेही व्यस्त असतो. सुदैवाने, आम्ही एकमेकांसाठी वेळ काढण्यास सक्षम आहोत आणि यामुळे नऊ वर्षांहून अधिक काळ हे नाते टिकवून ठेवण्यात यश आलं. मी माझ्या आयुष्यात ज्या वेगाने पुढे जात आहे, त्या वेगाने मी पूर्णपणे ठीक आहे'.

तापसी पन्नूने 2010 साली तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून सिनेविश्वात पदार्पण केलं. तर 2013 साली 'चश्मेबद्दूर' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण 'पिंक' या सिनेमामुळे तापसीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिनं आजवर 'बेबी', 'नाम शबाना', 'सूरमा', 'द गाझी अटॅक', 'पिंक', 'मनमर्जियां', 'बदला', 'मुल्क', 'सांड की आँख','थप्पड' आणि 'शाब्बास मिथू' सारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. याशिवाय ती 'वो लडकी है कहाँ', 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'जन गण मन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :तापसी पन्नूसेलिब्रिटीबॉलिवूड