Join us  

विवेक अग्निहोत्री सुरु केले 'द कश्मीर फाईल्स'चे शूटिंग, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती आहे विवेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 10:53 AM

चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग लंडन, अमेरिका आणि कॅनडामध्ये सुरू झालं आहे.

'द ताश्कंद फाईल्स'च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी त्यांचा आगामी प्रोजेक्ट 'द कश्मीर फाईल्स'ची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग लंडन, अमेरिका आणि कॅनडामध्ये सुरू झालं आहे. या सिनेमातून ते काश्मिरी पंडितांची व्यथा रुपेरी पडद्यावर दाखवणार आहेत. शेड्युलप्रमाणे तब्बल दीड महिने विवेक व त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशीसोबत परदेशात जाऊन सिनेमासाठी संशोधन करत आहेत. एवढंच नाही तर विवेक यांनी कश्मीरमधील विस्थापित कश्मीरी पंडितांशी याबाबत चर्चादेखील करत आहेत.

#KashmirUnreported  या नावाने ओळखले जाणारे काश्मिरी पंडितांच्या वंशाच्या शुद्धीकरणाच्या इतिहासातील भारतातील सर्वात मोठ्या नरसंहाराची कथा आहे. त्यातील काही घटनांची नोंद आहे तर काहींची नाही. विवेक रंजन अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी आता दशकांपूर्वी भारतात घडलेल्या या आपत्तीचे मूळ शोधत सत्येचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

'द कश्मीरी फाईल्स'बाबत बोलताना विवके राजन अग्निहोत्री म्हणाले, ''मला असे वाटतेय या सिनेमाचे पहिले शेड्यूल शूट करताना माझ्यासाठी खूप कठीण जाणार आहे. कारण या सिनेमात खरे लोक आणि वास्ताविकता  दाखवण्यात येणार आहेत. ज्या मला आणि पल्लवीला कॅमेरासमोर मांडायच्या आहेत. मला हे सत्य मांडण्याचा अधिकार मिळाला तर ही अर्धी लढाई मी जिंकल्यासारखं आहे. या सिनेमासाठी रिसर्च खूप विस्तृत आणि सत्याची बाजू समोर आणण्यासाठी मला माझी सगळी ताकत लावायची आहे. या घटनेची इतिहासात नोंद झाली असावी पण ती कुठे आहे ? किती लोकांना याबाबत माहिती आहे.?''

ते पुढे म्हणाले, “काश्मीर फाइल्ससारख्या चित्रपटातून सत्य समोर येणे गरजेचे आहे. नाहीतर अशा विषयावर एखादा सिनेमा येईल आणि जाईल असे या चित्रपटाच्या बाबतीत घडता कामा नये. कारण मी हा चित्रपट माझ्या हितचिंतक सांगण्यावरुन तयार करत आहे. ज्यांनी मला हा विषय मांडण्यासाठी प्रवृत्त केले. मला अनेक लोकांनी फोन  करून  सांगितले की, त्यांच्या डोळ्या देखत वडिलांचे 50 तुकडे करण्यात आले किंवा आईवर बलात्कार झाला. त्यांनी मला सांगितलेल्या सत्याची जाण ठेवत तेच सगळं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.''

हे दीर्घकाळ चालणारे संशोधन पल्लवी आणि विवेकला भारतापासून जर्मनी, लंडन,कॅनडा, अमेरिका इत्यादी देशामध्ये जात आहे.तिथे वास्तव्यास असलेल्या आणि या घटनेचे साक्षीदार असलेल्या विस्थापित कश्मीरी पंडिताची व्यथा आणि अनुभव समजून घेत आहेत. 'द काश्मीर फाईल्स' हा  भारतातील असा सिनेमा असणार आहे जो सर्वांच्या काळजाला पिळवटून टाकणारा असेल.

टॅग्स :पल्लवी जोशीद ताश्कंद फाईल्स