Join us  

७५ व्या वर्षी मुमताजने केला हेवी वर्कआऊट; व्हिडीओ पाहून जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 5:58 PM

Mumtaz: मुमताज यांनी इन्स्टाग्राम पेजवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुमताज (mumtaz). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर मुमताज यांनी प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. विशेष म्हणजे आज वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांनी आपला फिटनेस जपला असून या वयातही त्या हेवी वर्कआऊट करताना पाहायला मिळतात. सध्या त्यांचा असाच हेवी वर्कआऊट करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुमताज यांनी इन्स्टाग्राम पेजवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या हेवी वर्कआऊट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांचा उत्साह आणि एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे.

दरम्यान, मुमताज यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. 'आम्ही बसल्या जागी काहीच करु शकत नाही, आणि तुम्ही एवढा हेवी वर्कआऊट करताय', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या', असंही एका युजरने म्हटलं आहे. 

टॅग्स :मुमताजबॉलिवूडसेलिब्रिटी