पोलिसांची भूमिका सगळ्यात जास्त वेळा साकारल्याने या अभिनेत्याचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाला आहे समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:21 IST
एखादा कलाकार एकाच प्रकारची भूमिका साकारायला लागला की, त्या भूमिकेत तो अडकून राहातो. त्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या ...
पोलिसांची भूमिका सगळ्यात जास्त वेळा साकारल्याने या अभिनेत्याचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाला आहे समावेश
एखादा कलाकार एकाच प्रकारची भूमिका साकारायला लागला की, त्या भूमिकेत तो अडकून राहातो. त्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायचा प्रयत्न करत असतो. पण त्यातही एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका गाजली तर तो त्याच प्रकारच्या भूमिका साकारणे पसंत करतो. एखाद्या कलाकाराने एकाच प्रकारची भूमिका तब्बल 144 चित्रपटात साकारली आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. तब्बल 144 चित्रपटात एक अभिनेता पोलिसांच्या भूमिकेतच आपल्याला पाहायला मिळाला आहे. अभिनेता जगदीश राज खुराणा यांनी दीवार, डॉन, शक्ती, सिलसिला, आईना, बेशरम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील अधिकाधिक चित्रपटात त्यांनी पोलिसांची भूमिका साकारली आहे. ते त्यांच्या कारकिर्दीत 144 चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत दिसले आहेत. यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.जगदीश राज खुराणा यांच्यानंतर सर्वात जास्त पोलिसांची भूमिका साकारण्याचा मान अभिनेता शफी इनामदार यांना मिळाला आहे.जगदीश यांचे निधन 2013 मध्ये त्यांच्या राहात्या घरी झाले. पण आजही जगदीश राज यांचे नाव घेतल्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर वर्दीतील जगदीश राजच येतात.जगदीश राज यांची मुलगी अनिता राजदेखील बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. ती देखील तिच्या कारकिर्दीत अनेकवेळा पोलिसांच्या भूमिकेत दिसली आहे.144 चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत दिसल्यानेच अभिनेता जगदीश राज खुराणा यांच्या नावाचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. Also read : तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट बनवायला निर्मात्याला जवळजवळ लागले 20 वर्षं