या अभिनेत्याने केला खुलासा, ‘मेरा एक किस १०१ किस के बराबर’ या डायलॉगने झाला गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 20:57 IST
भोजपुरी सुपरस्टार अरविंद अकेला कल्लू सध्या प्रचंड चर्चेत आहे. भोजपुरीमधील नवा इमरान हाशमी म्हणून त्याच्याकडे सध्या बघितले जात आहे. ...
या अभिनेत्याने केला खुलासा, ‘मेरा एक किस १०१ किस के बराबर’ या डायलॉगने झाला गोंधळ!
भोजपुरी सुपरस्टार अरविंद अकेला कल्लू सध्या प्रचंड चर्चेत आहे. भोजपुरीमधील नवा इमरान हाशमी म्हणून त्याच्याकडे सध्या बघितले जात आहे. त्याचा नुकताच ‘रब्बा इश्क ना होवे’ हा चित्रपट रिलीज झाला असून, त्याने या चित्रपटात तब्बल ३०४ किस सीन दिले आहेत. त्यामुळेच त्याचे हे किस प्रकरण गाजत आहे. दरम्यान, त्याने आता या किस प्रकरणावर खुलासा केला असून, त्याने म्हटले की, चित्रपटात मी एका प्रेमीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात ‘मेरा एक किस १०१ किस के बराबर है’ असा एक डायलॉग आहे. यावरूनच हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. वास्तविक चित्रपटात केवळ तीनच किसिंग सीन आहेत. हे सीनदेखील मी प्रेक्षकांच्या डिमांडनुसार दिले आहेत. त्यामुळे चित्रपटात मी ३०४ वेळा किस सीन दिले हे पूर्णत: चुकीचे आहे. अरविंदचा हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. अरविंदने म्हटले की, ‘रब्बा इश्क ना होवे’ या चित्रपटाची कथा सामाजिकतेच्या अवतीभोवती फिरणारी आहे. चित्रपटात ब्रह्मचारी ते वैवाहिक परंपरा आणि त्यात निर्माण झालेली विकृती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रेमाच्या विविध छटा या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर दाखविण्यात आल्या आहेत. चित्रपटात सुरुवातीला ब्रह्मचारी त्यानंतर प्रेम आणि प्रेमातून निर्माण झालेला वेडसरपणा असा सीक्वेंस दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात कल्लू विविध भूमिकांमध्ये दिसत आहे. सुरुवातीला तो ब्रह्मचाºयाची भूमिका साकारताना दिसत आहे. जो तरुणींपासून दूर पळत असतो. मात्र रितू सिंग जेव्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा त्याचे तिच्यावर प्रेम जडते. येथूनच कथा पुढे जाते.