Join us  

वयाच्या 18 व्या वर्षी सेक्स वर्कर बनली होती ही अॅक्ट्रेस,आता तिच्यावर बनतोय बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 4:41 PM

अडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. आता बॉलीवूडमध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. हा बायोपिक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे.नुकतंच या सिनेमातील शकीलाचा म्हणजेच रिचाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. शकीला साकारणाऱ्या रिचाने यांत केरळची पारंपरिक साडी परिधान केली आहे. 

अडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.याच शकीलाचे वादग्रस्त आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले होते. यांत शकीलाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि खुलासे केले होते. तिचे हेच खुलासे आता सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येणार आहेत. आपल्या आईने जीवन उद्धवस्त केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शकीलाने यांत केला होता. आईच्या परवानगीने एका व्यक्तीने बलात्कार केला होता. त्या मोबदल्यात आईला त्याने पैसे दिले होते असा खुलासा तिने या आत्मचरित्रात केला आहे. 

शालेय जीवनात इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या शकीलाला सहावीनंतर दुर्दैवाने परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. उदरनिर्वाहासाठी मग आईनेच वेश्या व्यवसायात ढकलल्याचे तिने सांगितले आहे. वेश्या व्यवसाय करतानाच सुरुवातीच्या काळात फुकटात पॉर्न सिनेमात काम केल्याचेही तिने आत्मचरित्रात नमूद केले आहे. मात्र कालांतरानं तिचं जीवन पालटलं आणि दाक्षिणात्य पॉर्नस्टार म्हणून ती लोकप्रिय झाली. 

सिल्क स्मिता शकीलाची आदर्श आहे. शकीलाचे नाव अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांशीही जोडलं गेले. तिच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या, मात्र ती अविवाहितच राहिली. तिचा हाच जीवनपट रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. 

 

टॅग्स :रिचा चड्डाशकीला बायोपिक