Join us  

आता समोर येणार मोदींच्या पत्नीची ‘रिअल जीवनकथा’, ही अभिनेत्री साकारणार ‘रिल जसोदाबेन’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 2:03 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे.

निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसं हिंदी चित्रपटसृष्टीत विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक रुपेरी पडद्यावर येण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील 'द एक्सिडेंटल प्राइमिनिस्टर' अशा चित्रपटांची जोरदार चर्चा ऐकायला मिळाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरील चित्रपटही लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणार आहे. जसोदाबेन यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याची उत्सुकता होती. आता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आले आहे. 

जसोदाबेन म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याची जोडीदार. त्याच जसोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अहमदाबाद इथे होणार आहे. मोदी यांच्या या चित्रपटातील जसोदाबेन ही भूमिका आव्हानात्मक असून त्या भूमिकेला विविध पैलू तसंच कंगोरे असल्याचे बरखाने सांगितले आहे. त्यासाठी मोदींच्या जीवनप्रवासावर आधारित कथांचं तिने वाचन सुरू केले आहे. या भूमिकेसाठी गुजराती लहेजा शिकावा लागणार असल्याचे तिने म्हटले आहे. 

अहमदाबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग होणार असून ते शहर तिच्यासाठी काही नवे नाही. तिचे पती इंद्रनील सेनगुप्ता हेसुद्धा अहमदाबादचे आहेत. त्यामुळे हे शहर परिचयाचे असून अनेकदा इथे आल्याचे तिने सांगितले आहे. जसोदाबेन यांचं जीवन आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वाबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे ही आव्हानात्मक भूमिका यशस्वीरित्या साकारु असा विश्वास बरखाला आहे. 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉयनरेंद्र मोदी