Join us  

एक ही दिल है, कितनी बार जितोगे, सोनू सूद 4 देशांमधून आणतोय ऑक्सिजन प्लॉन्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 1:04 PM

देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा जाणवतो आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे .बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोनाकाळात अनेक लोकांसाठी देवदूत बनला आहे. त्याने गेल्या वर्षी लोकांना मदत करण्यास सुरवात केली. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता अभिनेत्याने कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

 देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा जाणवतो आहे. यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लॉन्ट घेण्याचे ठरविले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लॉन्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी आणतो आहेत.

दिल्ली आणि महाराष्ट्रासह कोरोना व्हायरसने प्रभावित असलेल्या राज्यात कमीतकमी चार ऑक्सिजन प्लॉन्ट बसवण्याचा सोनू सूदचा मानस आहे. याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला, 'आम्ही ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे बर्‍याच लोकांना त्रास सहन करताना पाहिले आहे. आम्हाला ते आता मिळाले आहे आणि ते आधीपासूनच लोकांना देत आहेत. तथापि, या ऑक्सिजन प्लॉन्ट केवळ संपूर्ण रुग्णालयांनाच पुरवठा करणार नाहीत तर ऑक्सिजन सिलिंडरही भरुन काढतील आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांची एक मोठी समस्या सुटेल.

रिपोर्टनुसार पहिल्या प्लॉन्टची ऑर्डर देण्यात आली आहे आणि ते 10 - 12 दिवसांत फ्रान्समधून भारतात येईल. सोनू सूद पुढे म्हणाला, 'वेळ आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर येईल आणि आम्ही अधिक जीव गमावू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत'. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सोनू सूदच्या कार्याचे कौतुक होते आहे.

टॅग्स :सोनू सूद